Nashik District Bank : संचालकांविरोधात न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्याची तयारी; जिल्हा बॅंक प्रशासन आक्रमक

bank nashik
bank nashiksakal

Nashik District Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा एनपीए वाढल्याने लायन्सस धोक्यात सापडल्यानंतर बॅंकेकडून वसुलीबाबत अॅक्शन प्लॅन बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच बँक प्रशासनाने वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

नियमबाह्य कर्जवाटप केलेल्या दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी), खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल) या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालकांविरोधात पोलिस तक्रार करूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने बँकेने आता न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

त्यासाठी बॅंकेतर्फे दिंडोरी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वसुलीची कार्यवाही प्रभावी होण्याची शक्यता आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेने नियमबाह्य कर्जवाटप केले. हे कर्जवाटप वसूल न झाल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली. कोट्यवधींच्या थकबाकीमुळे गाळात रुतलेल्या जिल्हा बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. जिल्हा बँकेच्या खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल), जऊळके शाखेत फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला होता.

या तिन्ही सोसायट्यांच्या सभासदांना मंजूर झालेले पीक कर्ज संचालक मंडळातील संचालकांनी स्वतःचे व नातेवाइकांचे नावाने वाटप करून घेतले. सोसायटीच्या इतर सभासदांना कर्ज रक्कम मिळालीच नाही. बँकेचे सनदी लेखापाल यांनी २०२१-२२ च्या लेखापरीक्षणात हे नियमबाह्य कर्जवाटप झाल्याचे उघड झाले होते. या बड्या थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली.

यावर बॅंकेने स्वतंत्र लेखापरीक्षण केले. यात संबंधित तिन्ही सोसायटी संचालक दोषी आढळले. त्यानंतर या प्रकरणी वणी पोलिसांत गत वर्षापूर्वीच तक्रार अर्ज सादर झाला. मात्र, ही फसवणूक क्लिष्ट स्वरूपाची असल्याने पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आला. बॅंकेने प्राथमिक तपासानुसार सविस्तर अहवाल वणी पोलिसांनी सादर केला होता.

bank nashik
Maharashtra News : देशांतर्गत जानेवारी ते ऑगस्टमध्ये विमानाने 12 कोटी जणांचा प्रवास; प्रवासी संख्येत वाढ

परंतु अधीक्षक कार्यालयातून अद्याप आदेश न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचे त्या वेळी वणी पोलिसांनी सांगितले होते. बँकेची खेडगाव शाखा वणी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने या प्रकरणी बँकेमार्फत १९ ऑक्टोबर २०२२ला लेखी तक्रार करण्यात आली होती. बँकेतर्फे पोलिसांकडे गुन्हा दाखल करावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. मात्र, काही महिन्यांचा कालावधी उलटूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचे दिसून येत होते.

यातच वसुली ठप्प झाल्याने सध्या जिल्हा बँक मोठ्या अडचणीत सापडली असून, तिचा परवाना धोक्यात आला आहे. यावर वारंवार पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने बॅंक प्रशासन, जिल्हा उपनिबंधक, सहकार निबंधक यांच्यातर्फे गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयामार्फत प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यासाठी बँकेला सर्वसामान्यांप्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन पुढील तपास व्हावा, यासाठी वणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना सामनेवाले यांचे विरुद्ध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबत दिंडोरी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

यांना झाले कर्जवाटप

दिंडोरी तालुक्यातील जऊळके सोसायटीतून जिल्हा बॅंकेचे माजी संचालक गणपतबाबा पाटील, त्यांचे बंधू अशोक, दिनकर यांच्या कुटुंबीयांना नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आले होते. यात दोषी सापडल्यानंतर गणपतबाबा पाटील यांनी कर्जाचा भरणा केला होता. तसेच खेडगाव बहृत सोसायटीतून ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विद्या पाटील यांना कर्जवाटप झाले होते. त्यांनीही मार्च २०२३ मध्ये आपल्या कर्जाचा भरणा केला आहे.

bank nashik
Nashik Onion News : जिल्ह्यातील 542 व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा; दुसऱ्या दिवशीही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com