esakal | शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने! कांद्यासाठी एकरी जिल्हा बँक देतेय 'इतक्या' रुपयांचे कर्ज..
sakal

बोलून बातमी शोधा

onion.jpg

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा बँकेला जमा झाले आहेत. मात्र बँकेने पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज देण्यात हात आखडता घेतला असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. जिल्हा बँकेतर्फे कांद्यासाठी कमी कर्ज दिले जात असल्याचे गाऱ्हाणे जिल्हा प्रशासनाकडे मांडण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने! कांद्यासाठी एकरी जिल्हा बँक देतेय 'इतक्या' रुपयांचे कर्ज..

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून जिल्हा बँकेतर्फे कांद्यासाठी एकरी दहा हजार रुपयांचे कर्ज देत तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कर्ज मंजुरी पत्रकानुसार एकरी ३० हजार रुपयांचे कर्ज मिळायला हवे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्याच अनुषंगाने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी दहा हजार कर्ज घेतल्यावर कांदा लागवडीनंतर लागणारे पैसे कर्जाच्या रूपाने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली. 

कर्ज देण्यात हात आखडता घेतला असल्याची शेतकऱ्यांची तक्रार

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा बँकेला जमा झाले आहेत. मात्र बँकेने पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज देण्यात हात आखडता घेतला असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. जिल्हा बँकेतर्फे कांद्यासाठी कमी कर्ज दिले जात असल्याचे गाऱ्हाणे जिल्हा प्रशासनाकडे मांडण्यात आले होते. त्या वेळी सहकार विभाग आणि जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार कर्जवाटप करण्याचे आदेश दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सात-बारा उताऱ्यावर कांदालागवडीचे क्षेत्र नोंदविलेले नाही, असा मुद्दा उपस्थित करत बँकेकडे उपलब्ध असलेल्या पैशातून शेतकऱ्यांची गरज भागविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले. येवला भागात बँकेचे अधिकारी आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये कांदा कर्ज एकरी दहा हजार देण्यासंबंधी चर्चा झाल्याची माहिती जिल्हा बँकेच्या प्रशासनापर्यंत पोचली आहे. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला ४३७ कोटी ३४ लाख रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्‍चित करून देण्यात आले आहे. त्यांपैकी ५४ टक्के कर्ज वितरण आतापर्यंत झाले आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?
 

जिल्हा बँकेच्या खरीप 
कर्ज वितरणाची स्थिती 

० कर्ज वितरण : २३५ कोटी ९८ लाख 
० कर्ज दिलेले क्षेत्र : २० हजार १६४ हेक्टर 
० कर्ज दिलेले शेतकरी : २४ हजार २७९ 
(गेल्या वर्षी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १७६ कोटींचे कर्ज वितरण झाले होते.)  

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top