esakal | नाशिकच्या नाट्यविश्वाचा हिरा हरपला! दिग्दर्शक-अभिनेता प्रशांत हिरे काळाच्या पडद्याआड
sakal

बोलून बातमी शोधा

prashant hire

नाशिकच्या नाट्यविश्वाचा हिरा हरपला! दिग्दर्शक-अभिनेता प्रशांत हिरे काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By
टीम ईसकाळ

नाशिक : येथील नाट्य दिग्दर्शक-अभिनेते प्रशांत हिरे (Prashant Hiray) यांचे आज (दि.७) दुपारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर देवळालीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनातून (corona) ते काही दिवसापूर्वी बरे झाले होते, परंतु त्यांना श्वसनाचा त्रास सुरु असल्याने रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. (Drama director-actor Prashant Hiray passed away)

हेही वाचा: खबरदार! अकरा वाजेनंतर दुकान सुरु ठेवाल पडेल महागात

देशपातळीवर नाटक गाजवलं!

न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये ते नोकरीला होते. १९९५ मध्ये त्यांची नाशिकमध्ये बदली झाली. तेंव्हापासून नाशिकच्या नाट्यविश्वात त्यांनी आपल्या दिग्दर्शनाने एक नवीन चैतन्य निर्माण केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटक आणि एकांकिका देशपातळीवर गाजल्या. 'सावित्री उपाख्यान', 'दर्द-ए-डिस्को' यासारख्या नाटकांनी राज्यनाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. त्याच बरोबर 'नादखुळ्या', 'विठाबाईचा कावळा', 'अरण्य', 'गस्त', 'माय डियर शुभी' या एकांकिकांनी देखील अनेक पारितोषिके पटकावली आहेत. दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयातही आपली छाप सोडली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रंगभूमीच्या सेवेत समर्पित केले होते. नाशिकमध्ये नाट्यकार्यशाळा, अभिवाचन या माध्यमातून अनेक नाट्यकलावंत हिरे यांनी घडवले असून, नाशिकच्या नाट्यचळवळीत त्यांचे प्रमुख योगदान होते.

हेही वाचा: नाशिककरांचे वाचले तब्बल साडेबारा कोटी रुपये!

loading image