जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे : युद्धाच्या भडक्यामुळे खत टंचाईचे ढग | Nashik Agriculture | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fertilizer

युद्धाच्या भडक्यामुळे खत टंचाईचे ढग : विवेक सोनवणे

नाशिक : रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या भडक्यामुळे रासायनिक खताच्या टंचाईचे ढग जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या खताच्या साठा आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर करून ठेवावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे (Vivek Sonawane) यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक : शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बनवला रस्ता

खताचा तुटवडा होणार असल्याने किमती वाढण्याची शक्यता अधिक आहे. सर्वाधिक खतांची देशात आयात केली जाते. युद्धामुळे त्याचा फटका देशाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात खताचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकऱ्यांनी आवश्‍यक तेवढी खते खरेदी करून ठेवावीत, असे कृषी विभागातर्फे ( Department Of Agriculture ) स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: कांदा पिकावर मर, होमनी, करपा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

Web Title: District Superintendent Agriculture Officer Vivek Sonawane Said Fertilizer Shortage Due To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..