esakal | "किराणाची व्हॉटस्‌अपद्वारे यादी पाठवा.. जीवाशी खेळू नका"
sakal

बोलून बातमी शोधा

kirana sancharbandi 1.png

रविवारी (ता. 22) नाशिकमध्ये सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र आज सोमवारी(ता.२३)  सकाळपासूनच नाशिककर रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत होते. जमावबंदी आदेश असूनही तो न जुमानता लोक रस्त्यांवर दिसत होते. अत्यावश्‍यक वस्तू म्हणून किराणा दुकानांना सुट देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील किराणा मालाची दुकाने आज सकाळपासूनच उघडी होती. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक असतांनाही लोक उगीचच भितीपोटी गरजेपेक्षा जास्त किराणा खरेदी करत असल्याचे चित्र  पहायला मिळाले.

"किराणाची व्हॉटस्‌अपद्वारे यादी पाठवा.. जीवाशी खेळू नका"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. फक्त जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेच सुरू राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. सोमवारी (ता. 23) नाशिककरांनी बाजारपेठेत किराणा माल घेण्यासाठी गर्दी केली होती. वारंवार गर्दी न करण्याचे आवाहन करूनही सायंकाळपर्यंत दुकानांमध्ये गर्दी कायम होती. किराणा दुकानांमध्ये गर्दी करून गरजेपेक्षा जास्त खरेदी केली जात होती. गर्दी करून जीवाशी खेळू नका, असे आवाहन किराणा विक्रेता संघटनेतर्फे करण्यात येत आहे. 

नाशिककर रस्त्यावर उतरल्याचे चित्र
रविवारी (ता. 22) नाशिकमध्ये सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र आज सोमवारी(ता.२३)  सकाळपासूनच नाशिककर रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत होते. जमावबंदी आदेश असूनही तो न जुमानता लोक रस्त्यांवर दिसत होते. अत्यावश्‍यक वस्तू म्हणून किराणा दुकानांना सुट देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील किराणा मालाची दुकाने आज सकाळपासूनच उघडी होती. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक असतांनाही लोक उगीचच भितीपोटी गरजेपेक्षा जास्त किराणा खरेदी करत असल्याचे चित्र पहायला मिळाले. काही दुकानदारांना तर ग्राहकांची गर्दी सांभाळणेही कठीण होत होते. रविवार कारंजा, भद्रकाली, दहीपूल, पंचवटी यासह शहराच्या इतर भागातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. पाच पेक्षा जास्त ग्राहक दुकानांमध्ये असता कामा नये असा आदेश असतानाही तो धुडकाविला जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळाले. शहरात गर्दी दिसत असली तरी उपनगरातील अनेक ठिकाणी पोलिसांनी किराणा दुकाने देखील बंद केली होती. बुधवारी (ता. 25) मराठी नववर्षाची सुरूवात म्हणजेच गुढीपाडवा असल्याच्या पार्श्‍वभूमीवरही खरेदी केली जात असल्याचे चित्र होते. 

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल

आरोग्याशी खेळू नका 
बाजारपेठेत मुबलक प्रमाणात किराणा माल उपलब्ध आहे. ग्राहकांनी विनाकरण किराणा दुकानांमध्ये गर्दी करू नये. होलसेल व्यापाऱ्यांनी उद्यापासून (ता. 24) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज दिवसभर लोकांनी गर्दी केली. अनेक ग्राहक तोंडाला मास्क न लावताच येत होते. त्यामुळे इतरांनाही धोका होतो. नाशिककरांनी किराणा दुकानांमध्ये गर्दी करू नये. - प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, किराणा व्यापारी संघटना 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

व्हॉटस्‌अपद्वारे यादी पाठवा 
किराणा व्यापारी संघटनेतर्फे घरपोच किराणा देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र रिक्षा तसेच इतर वाहनांना बंदी घालण्यात आल्याने आता नाशिककरांनी आपली यादी दुकानदारांच्या व्हॉटस्‌अप नंबरवर पाठवावी. त्यानुसार किराणा माल काढून ठेवला जाईल व फोन केला जाईल. त्यामुळे किराणा दुकानातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.