Nashik | अखेर डॉक्टर नववधूची होणारी अघोरी कौमार्य चाचणी 'अशी' टळली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

Nashik | अखेर डॉक्टर नववधूची होणारी अघोरी कौमार्य चाचणी टळली!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : अखेर नाशिकमध्ये होणारी डॉक्टर नववधूची अघोरी कौमार्य चाचणी (virginity test) टळली आहे. सुशिक्षित कुटूंब. मात्र, तरीही नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये रविवारी लग्न झाल्यानंतर हा प्रकार होणार होता. मात्र अखेर नववधूची कौमार्य चाचणी टळली आहे. काय घडले नेमके?

कौमार्य चाचणीची एक कुप्रथा

कौमार्य चाचणीची कुप्रथा असून यावरून अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत. लग्नानंतर यात फक्त वधूची कौमार्य याचणी घेतली जाते. यात जातपंचायत आपण दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर वर आणि वधूंना झोपायला सांगते. या कपड्यांवर रक्ताचा डाग पडला, तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा लग्न अमान्य केले जाते. वधूला मारहाण होते. पालकांना शिक्षा केली जाते. त्यांच्याकडून खूप मोठा आर्थिक दंड वसूल केला जातो. कुटुंबाला वाळीतही टाकले जाते.

हेही वाचा: Airtel | ग्राहकांना झटका! 20 टक्क्यांनी दरात केली वाढ

अखेर डॉक्टर नववधूची होणारी अघोरी कौमार्य चाचणी टळली!

मुलीचा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये... सारे सुशिक्षित कुटूंब. मात्र, तरीही नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये रविवारी लग्न झाल्यानंतर हा प्रकार होणार होता. याची तक्रार अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे आली होती. जातपंचायतीविरोधात केलेली तक्रार आणि पोलिसांच्या कारवाईमुळे साऱ्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे हा प्रकार टळला. अनिंसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. अंनिसच्या तक्रार अर्जाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी हॉटेल मालकाला नोटीस बजावली. काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा दिला. सोबतच लग्नस्थळी दाखल होत त्यांनी जातपंचायत सदस्यांनाही फैलावर घेतले. असे अघोरी प्रकार केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला. त्यानंतर जातपंचायतही नरमल्याचे समजते. असे प्रकार घडल्यास अंधश्रद्धा निर्मुलन समिती किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा: ''कोरोनाच्या तिसऱ्या डोसची गरज, सरकारने राष्ट्रीय धोरण लवकर जाहीर करावं''

अनेकांनी आत्महत्या केल्या

कौमार्य चाचणीची कुप्रथा एका समाजात आहे. लग्नानंतर यात फक्त वधूची कौमार्य याचणी घेतली जाते. यात जातपंचायत आपण दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर वर आणि वधूंना झोपायला सांगते. या कपड्यांवर रक्ताचा डाग पडला, तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा लग्न अमान्य केले जाते. वधूला मारहाण होते. पालकांना शिक्षा केली जाते. त्यांच्याकडून खूप मोठा आर्थिक दंड वसूल केला जातो. कुटुंबाला वाळीतही टाकले जाते. यावरून अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत.

अंनिसकडून कारवाईचे स्वागत

दरम्यान, अंनिस आणि जातपंचायत मूठमाती अभियानानेच राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. विशेष मुलींनी याबाबत पुढे यावे. आवर्जुन तक्रार द्यावी. बदनामीच्या भीतीने मौन बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नवरा मुलगा हा स्वतः सुशिक्षित असतो. त्यानेच असे प्रकार घडू नयेत म्हणून पुढाकार घ्यावा. आपल्या कुटुंबाची समजूत काढावी. त्यानंतर असे प्रकार घडणारच नाहीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

बदनामीच्या भीतीने मौन बाळगू नये...

नवरा मुलगा हा स्वतः सुशिक्षित असतो. त्यानेच असे प्रकार घडू नयेत म्हणून पुढाकार घ्यावा. आपल्या कुटुंबाची समजूत काढावी. त्यानंतर असे प्रकार घडणारच नाहीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. अंनिस आणि जातपंचायत मूठमाती अभियानानेच राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. विशेष मुलींनी याबाबत पुढे यावे. आवर्जुन तक्रार द्यावी. बदनामीच्या भीतीने मौन बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

loading image
go to top