डॉक्टरांनी वाढदिवस सत्कारणी लावला; दिव्यांग विमलला कृत्रिम पायांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor gave Divyang Vimal a prosthetic leg on the occasion of his birthday.

डॉक्टरांनी वाढदिवशी दिली दिव्यांग विमलला कृत्रिम पायांची भेट

देवळा (जि. नाशिक) : वाजगाव (ता. देवळा) येथील आदिवासी कुटुंबातील काळू शंकर सोनवणे यांची मुलगी विमल जन्मापासून दोन्ही पायाने अपंग आहे. आपल्या दोन्ही हातांच्या आधारे ती घरातून बाहेर ये- जा करते. जास्त अंतराच्या प्रवासासाठी तिचे वडील उचलून घेऊन जातात. हे सर्व गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सुरु आहे. पण आता ती तीला प्रवासासाठी आधाराची गरज भासणार नाही, कारण वाढदिवसाचे औचित्य साधून दोन्ही पायाने अपंग असलेल्या विमलला अपंगबूट व कुबडी भेट देऊन देवळा येथील डॉक्टर दाम्पत्याने गुरुवारी (ता. १८) अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला आहे.

...अन् चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली

तालुक्यातील मुळचे गुंजाळनगर येथील रहिवासी असलेले व सध्या देवळ्यातील जुन्या तहसील कार्यालयासमोरील धनदाई हॉस्पिटल चालवत असलेले डॉ. त्र्यंबक देवरे यांनी पत्नी त्रिवेणी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीची जपणूक करून साजरा करण्याचे ठरवले. वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत दिव्यांग विमलला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अपंग बूट व कुबड्या भेट दिल्या. मिळालेले साहित्य पाहून विमलच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. मी पायावर उभी राहू शकते, हा आत्मविश्‍वास बाळगून बूट व कुबड्यांच्या आधारे ती घरातून बाहेर आली. हे पाहून सोनवणे परिवारातील सर्वच सदस्यांचे चेहरे आनंदाने खूलुन गेले.

हेही वाचा: नाशिककर वेदांतने वेधले जगभरातील तज्‍ज्ञांचे लक्ष्य!

सुरवातीला नवीन असल्याने काहीवेळा आधाराची आवश्यकता जाणवेल. पण, हळूहळू ती स्वतः उभी राहील, अशी माहिती डॉ. त्र्यंबक देवरे यांनी दिली. या आदर्श उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. या वेळी केंद्रीय मानवाधिकार संगठनचे नाशिक जिल्हाध्यक्ष विलास माळी, वाजगाव ग्रामपंचायतीचे लिपिक एस. ए. देवरे, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: डाॅक्टर नववधूची होणार कौमार्य चाचणी; लांच्छनास्पद प्रकार | Nashik

loading image
go to top