Voting ID : मतदानासाठी बारापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य, घरोघरी पोहोचणार ‘मतदान स्लिप’; पाहा संपूर्ण यादी

Lok Sabha Voting : ज्यांच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल त्यांनी आपली ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करावीत.
Voting Document
Voting DocumenteSakal

Documents required for Voting : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना, मतदान केंद्रावर बारापैकी कुठलाही एक पुरावा दाखविल्यास मतदान करता येणार आहे. मतदानाच्या पाच दिवस अगोदर मतदारांच्या घरी मतदान पावती पोहोचणार असून, त्यावर मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव व क्रमांक नमूद केलेला असणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान करणे अधिक सुलभ होईल.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र दिले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, ज्यांच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल त्यांनी आपली ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करावीत.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्राव्दारे मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील त्रुटी, शब्दलेखनातील चुका इत्यादी किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. मतदारांचे नाव मतदार यादीत असेल आणि त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांनी वितरित केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारण्याचेही आदेश आहेत.

Voting Document
Voting Awareness : चिमुकल्यांच्या हाती ‘मतदान करा’ची चिठ्ठी ; मतदारांची टक्केवारी वाढीसाठी शाळांमध्ये उपक्रम

मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त १२ पैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

मतदान पावती हा पुरावा नव्हे

मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख व वेळ आदी माहिती उपलब्ध होण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना मतदार माहिती पावती (स्लिप) वितरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मतदानाच्या पाच दिवस आधी त्याचे वाटप करण्यात येईल. परंतु, ही पावती मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. केवळ आपले मतदान कुठल्या केंद्रावर होणार आहे, याविषयी माहिती देणार असल्याने मतदारांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

Voting Document
Voting List Registration: अजूनही मतदार यादीत नाव नाही? या तारखेपर्यंत नोंदणी करण्याची शेवटची संधी, कागदपत्र ठेवा तयार

यापैकी एक पुरावा ग्राह्य

  1. आधारकार्ड

  2. मनरेगा जॉबकार्ड

  3. बँक, टपाल कार्यालयाचे छायाचित्रासह पासबुक

  4. कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

  5. वाहनचालक परवाना

  6. पॅनकार्ड

  7. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर स्मार्टकार्ड

  8. पासपोर्ट

  9. फोटोसह पेन्शन दस्तऐवज

  10. केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे सेवा ओळखपत्र

  11. खासदारांचे, आमदारांचे अधिकृत ओळखपत्र

  12. विशेष विकलांग प्रमाणपत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com