Dr. Bharati Pawar News: कौशल्‍यांतून युवकांमध्ये यशस्‍वी होण्याची क्षमता : मंत्री डॉ. भारती पवार

Dr Bharti Pawar
Dr Bharti Pawaresakal

Dr. Bharati Pawar News : देशातील युवकांमध्ये विविध प्रकारची कौशल्‍ये दडलेली आहेत. क्रीडा क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रांमध्ये या युवकांमध्ये यशस्‍वी होण्याची क्षमता आहे. त्‍यांना योग्‍य दिशा दाखवताना पाठबळ देण्याची गरज आहे.

पॅरा आशियाई स्‍पर्धेत सुवर्णपदक विजेता दिलीप गावित हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रविवारी (ता. ५) केले. (Dr Bharati Pawar News statement Ability to be successful in youth through skills nashik)

चीन येथील आशियाई पॅरा स्‍पर्धेत पदकविजेता धावपटू दिलीप गावित व त्‍याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचा डांग सेवा मंडळ संस्‍थेतर्फे सत्‍कार समारंभ आयोजित केला होता. अशोक स्तंभावरील रुंग्टा विद्यालयातील सभागृहात झालेल्‍या या सत्‍कार कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पवार बोलत होत्‍या.

याप्रसंगी आमदार डॉ. सत्‍यजित तांबे, ऑलिं‍पिकपटू कविता राऊत, आदिवासी विकास आयुक्‍तालयातील अपर सचिव संदीप गोलाईत, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, सचिव मृणाल जोशी आदी उपस्‍थित होते.

मंत्री डॉ. पवार म्‍हणाल्‍या, की देशभरातील क्रीडा कौशल्‍ये असलेले खेळाडू पुढे आणण्यासाठी सध्याच्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सरकारने विविध प्रकल्‍प, योजना राबविल्‍या आहेत. या योजनांचा खेळाडू, प्रशिक्षकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

आमदार सत्‍यजित तांबे म्‍हणाले, की क्रीडासंकुल, क्रीडा विद्यापीठ यांसारख्या अभिनव संकल्‍पना आपल्‍याकडे कागदापुरत्‍या मर्यादित स्‍वरुपात आहेत.

खेळाडूंना चांगल्‍या सुविधा मिळाल्‍यास पदकांची व पदकविजेत्‍या खेळाडूंची संख्या आणखी वाढेल. जिल्‍हास्‍तरावर आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील क्रीडासंकुल उभारण्याची आवश्‍यकता त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

श्री. गोलाईत म्‍हणाले, की आदिवासी विभागामार्फत दिलीप गावितसमवेत इतर गुणवंत खेळाडूंना मदत करण्यासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. कार्यक्रमात पदकविजेत्‍या दिलीपचा सत्‍कार ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

तर प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचाही या वेळी सत्‍कार करण्यात आला. डांग सेवा मंडळाचे क्रीडा संचालक प्रा. नरेंद्र पाटील यांनी प्रास्तविक केले.

Dr Bharti Pawar
Nashik: दिवाळीच्या सुट्टीत माळेगाव MIDCत गस्तीपथक; उद्योजकांनी सहकार्य करण्याचे पोलिस निरीक्षक निकम यांचे आवाहन

दरम्‍यान, मिरवणुकीच्‍या माध्यमातून दिलीपचे जोरदार स्‍वागत करण्यात आले. या वेळी आदिवासी नृत्‍य करताना तसेच दिलीपची खुल्‍या गाडीतून मिरवणूक काढताना त्‍याच्‍या यशाचा जल्‍लोष केला.

ऑलिंपि‍कमध्ये पदकाचे ध्येय

सत्‍काराला उत्तर देताना दिलीप म्‍हणाला, की आंतरराष्ट्रीय स्‍तरावर पदक जिंकल्‍याने आत्‍मविश्‍वास बळावला आहे.

आता ऑलिंपिक स्‍पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय आहे. दिव्‍यांग असल्‍याचा न्‍यूनगंड दूर करताना प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी घडविले. त्‍यांच्‍या अथक परिश्रमांमुळे आजवरचा प्रवास साधता आल्याचेही त्‍याने नमूद केले.

खेळाडूंसाठी कार्य व्‍हावे

ग्रामीण, दुर्गम भागामधील खेळाडूंमध्ये क्षमता आहेत. या खेळाडूंना व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्यासाठी ठोस कार्य व्‍हावे, अशी अपेक्षा प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी व्‍यक्‍त केली. दिलीपने घेतलेल्‍या कष्टांची माहिती त्‍यांनी उपस्‍थितांना दिली.

Dr Bharti Pawar
Nashik Water Crisis: नांदगाव, देवळा, चांदवडच्या दुष्काळासाठी आमदार सरसावले; दुष्काळाच्या झळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com