Sakal Exclusive : डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांवर 12 कलमी कार्यक्रम : डॉ. दिनेश ठाकरे

Sakal Exclusive : डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांवर 12 कलमी कार्यक्रम : डॉ. दिनेश ठाकरे

Sakal Exclusive : समाजातील विविध घटकांशी सुसंवाद साधत त्‍यांच्‍या डॉक्‍टरांकडून असलेल्‍या अपेक्षा जाणून घेणे आवश्‍यक आहे. तेव्‍हाच डॉक्‍टरांचे बहुतांश प्रश्‍न सुटून रुग्‍ण व डॉक्‍टर यांच्‍यात सुदृढ नाते निर्माण होऊ शकते.

याअनुषंगाने येत्‍या काळात बारा कलमी कार्यक्रम राबविताना डॉक्‍टरांच्‍या समस्‍या सोडविण्यासह त्‍यांचे आरोग्‍य चांगले राहावे, यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे नियोजित अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी मांडली. (Dr Dinesh Thakre statement about 12 point program on problems of doctors nashik news)

आयएमए, नाशिकतर्फे आयोजित पुरस्‍कार वितरण समारंभासाठी नाशिकला आलेल्‍या डॉ. ठाकरे यांनी ‘सकाळ’सोबत संवाद साधताना आगामी धोरणांची माहिती दिली. या वेळी डॉ. ठाकरे म्‍हणाले, की डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्याच्‍या उद्देशाने विविध बारा मुद्दे निश्‍चित केलेले आहेत. या माध्यमातून बहुतांश प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे डॉक्‍टर व रुग्‍ण, त्‍यांचे नातेवाइकांमध्ये चांगला संवाद होणे गरजेचे आहे. यामुळे बहुतांश वाद मिटू शकतात. संघटनात्‍मक भूमिकेचे दस्‍तऐवजीकरण करण्यासह समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन चालण्यावर भर असेल.

सभासद डॉक्‍टरांना कायदेविषयक मार्गदर्शनासाठी मेडिको लीगर सेलचे काम अधिक प्रभावी करण्यावर भर राहील. प्रोफेशन प्रोटेक्‍शन स्‍कीम, मेडिकल जॉस्टिं‍ग प्रिव्‍हेन्‍शन सेल यासंदर्भातदेखील काम केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sakal Exclusive : डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांवर 12 कलमी कार्यक्रम : डॉ. दिनेश ठाकरे
SAKAL Exclusive: सिन्नरच्या पूर्वेकडील दुष्काळ हटणार! वाचा सविस्तर

पब्लिक ग्रीव्‍हन्‍स रिड्रेसलद्वारे प्राथमिक स्‍तरावर प्रश्‍न सोडविणार

सध्याच्‍या परिस्‍थितीत किरकोळ वाददेखील पोलिस ठाण्यापर्यंत पोचत असल्‍याची अनेक उदाहरणे आहेत. प्राथमिक स्‍तरावरच या प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी पब्लिक ग्रीव्‍हन्‍स रिड्रेसलची उभारणी केली जाईल. या माध्यमातून सर्वसामान्‍य या व्‍यासपीठावर आपल्‍या तक्रारी करू शकतील व त्‍यांचे निराकरणदेखील केले जाईल.

सध्या नागपूरला याचा यशस्‍वी प्रयोग झालेला आहे. काही घटनांमध्ये डॉक्‍टरांवर हल्‍ले केले जातात. असे गैरप्रकार रोखण्यासाठी डॉक्‍टरांची कार्यशाळा घेऊन आपत्कालीन परिस्‍थितीत काय उपाययोजना कराव्‍यात यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. ठाकरे म्‍हणाले.

ग्रुप प्रॅक्‍टिसला प्राधान्‍य द्यावे

कॉर्पोरेट हॉस्‍पिटलच्‍या प्रशासकीय पदांवरही डॉक्‍टरांची नियुक्‍ती असावी, अशी आग्रही मागणी राहणार आहे. तसेच विविध पातळ्यांवर डॉक्‍टरांनी एकत्रित येऊन ग्रुप प्रॅक्‍टिसला प्राधान्‍य द्यावे, यासाठी त्‍यांना प्रोत्‍साहित केले जाणार असल्‍याचे डॉ. ठाकरे यांनी सांगितले.

Sakal Exclusive : डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांवर 12 कलमी कार्यक्रम : डॉ. दिनेश ठाकरे
Sakal Exclusive : विद्यार्थी हितासाठी पत्नी, पुतणी, भाचीला बनवले मॅडम!

नाशिकसारख्या शहरांमध्ये रुग्‍णालय नोंदणीची समस्‍या गंभीर असून, जाचक अटी शिथिल करून तातडीने नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्याबाबत राज्‍यस्‍तरावर पाठपुरावा केला जाईल.

तसेच डॉक्‍टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीयस्‍तरावर कायदा असावा, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्तव्‍यावर असताना शासकीय, तसेच खासगी डॉक्‍टरांवरील हल्‍ला, हिंसाचाराच्‍या घटनेत कायदेशीर कारवाई व्‍हावी, या मागणीचा पाठपुरावा केला जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Sakal Exclusive : डॉक्‍टरांच्‍या समस्‍यांवर 12 कलमी कार्यक्रम : डॉ. दिनेश ठाकरे
Sakal Exclusive : वस्रोद्योग धोरणातून येवल्याची पैठणी गायब!; येवल्याची ओळख पुसली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com