Sakal Exclusive : विद्यार्थी हितासाठी पत्नी, पुतणी, भाचीला बनवले मॅडम!

Nagde : Temporary teachers from teachers' families present for teaching in primary school.
Nagde : Temporary teachers from teachers' families present for teaching in primary school.esakal

Nashik News : वर्ग पहिली ते सातवीपर्यंतचा मात्र शाळेला शिक्षक फक्त दोनच... अशा शाळेत विद्यार्थी कसे घडणार आणि पालकही अशा शाळेत मुलांना कसे पाठविणार, हा प्रश्नच आहे..?

मात्र आपल्या सेवेशी प्रामाणिक असलं आणि विद्यार्थी घडविण्याची तळमळ असेल, तर आपोआप पर्याय सुचतात... असाच पर्याय शोधला आहे, तो नागडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी... विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी या दोन बहाद्दर विद्यार्थिप्रिय शिक्षकांनी आपल्या पत्नीसह भाची, पुतणी तसेच निवृत्त शिक्षकालाही शिकविण्यासाठी शाळेत बोलवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले आहे.

हे पाऊल योग्य की अयोग्य, हा निर्णय शिक्षण विभाग करेलही; पण आधुनिक गुरुजींच्या या ज्ञानदानाच्या प्रयत्नांना सलामच करावा लागेल! (Made a wife nephew niece madam for benefit of students Guruji experiment in Nagde teachers not available alternative found retired teachers also employed Nashik News)

तालुक्याला केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार अशी सर्वच पदे गेल्या दहा-बारा वर्षांत लाभली, पण जिल्हा परिषदेच्या रिक्त शाळांचे दुखणे मात्र संपले नाही. याचमुळे किमान शेकडो आंदोलने होऊन शाळांना कुलूप लावण्याचे प्रकारही गुरुजी मिळावेत, यासाठी घडले आहेत. आजही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकाची तब्बल १४२ पदे रिक्त आहेत.

नागडे येथील शाळेची, तर अवस्था अजूनच बिकट असून, येथे पहिली ते सातवीचे वर्ग असून, १३८ विद्यार्थी शिक्षण घेतात. सात वर्गांसाठी सात शिक्षक हवे असताना २०१९ पासून चारच शिक्षक कार्यरत होते. त्यातही मेमध्ये एक शिक्षक निवृत्त झाला, तर एकाची बदली झाली. मात्र येथे नव्याने कोणी आलेच नसल्याने फक्त दोनच शिक्षक शिल्लक राहिले.

परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची वेळ आली. शहराजवळ हे गाव असल्याने काही पालकांनी मुलांना गैरसोयीचे असूनही येवल्याच्या शाळेत पाठविण्याचीही इच्छा व्यक्त केली. यामुळे शाळेतील पटसंख्या घटून शिक्षकांच्या मंजूर पदांनाही धोका निर्माण झाला असता; शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचीही शैक्षणिक हानी झाली असती हे नक्की!

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nagde : Temporary teachers from teachers' families present for teaching in primary school.
Nashik News : किरकोळ कारणावरून चालकाला मारहाण; इंधन वाहतूकदारांचे वाहतूक बंद आंदोलन

मात्र आपल्यातील विवेकशीलता जागवत उपक्रमशील मुख्याध्यापक कैलास गाडे यांनी बारावी शिक्षण झालेली आपली पत्नी आशा, पुतणी साक्षी तसेच वैजापूर येथून एम. एस्सी झालेली भाची वैष्णवी माळोदे यांना बोलावून त्यांच्याकडे शाळेच्या वर्गाची जबाबदारी दिली. त्यांचे सहकारी उपशिक्षक चंद्रकांत पवार यांनीही आपली बारावी शिक्षण झालेली पत्नी अर्चना यांना शाळेत बोलवत अध्यापनाची जबाबदारी दिली.

एवढेच नव्हे, तर मेमध्ये निवृत्त झालेले शिक्षक राजकुमार भावसार यांनीही निवृत्त झालो तरी मनाने थकलो नाही. ज्या विद्यार्थ्यांमुळे सुखी आयुष्य गेले, त्यांच्यासाठी अजूनही काम करायची तयारी असल्याचे दर्शवत पुन्हा शाळेच्या सेवेत ते अनौपचारिकरीत्या रुजू झाले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ साताळकर यांच्या पुढाकाराने गावातील एम. एस्सी झालेली कोमल साळुंखे हीदेखील अध्यापन करण्यासाठी शाळेत येत असल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणितासारखे विषयाचेही ज्ञान मिळू लागले आहे. गाडे, पवार या शिक्षकांच्या कुटुंबीयांसह भावसार यांच्या या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांना सात वर्गाला पाहिजे तेवढे शिक्षक मिळाले असून, अध्यापनाचे कार्यही सुरळीत पार पडले आहे.

Nagde : Temporary teachers from teachers' families present for teaching in primary school.
Nashik News : किरकोळ कारणावरून चालकाला मारहाण; इंधन वाहतूकदारांचे वाहतूक बंद आंदोलन

या सर्वांना हेही माहीत आहे, की आपल्याला या कामाचा रुपयाही मोबदला म्हणून मिळणार नाही; पण जेथे शिक्षक नाही, तेथे ज्ञानदान करून विद्यार्थी घडविण्याचे समाधान हाच मोठा मोबदला असल्याचे हे शिक्षक बोलून दाखवतात. नव्याने शिक्षक नियुक्त होईपर्यंत या शिक्षकांच्या मदतीने शाळा चालविण्याचा निर्धार मुख्याध्यापक गाडे यांनी केला आहे.

एकीकडे शासन विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षण करत असताना दुसरीकडे त्यांना शिक्षकच देऊ शकत नसल्याची परिस्थिती असल्याने या शिक्षकांनी उचललेले हे पाऊल इतर शाळा व गुरुजींसाठी नक्कीच आदर्शवत आहे. याचमुळे त्यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Nagde : Temporary teachers from teachers' families present for teaching in primary school.
Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

"जिल्हा परिषदेच्या शाळाच ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवितात. आमच्या शाळेचाही नावलौकिक असून, शिक्षक संख्या कमी झाल्याने पालकांतून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे नव्याने शिक्षक बदलून येईपर्यंत आम्ही कुटुंबातील सदस्यांनाच शिकवण्यासाठी शाळेत घेऊन जात असून, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळले जात आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात आणि शिक्षक पटसंख्या ही कायम राहावी, शिवाय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठीच आम्ही हे पाऊल उचलले आहे."

- कैलास गाडे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागडे

"लहान मुले असल्याने त्यांना गावातच चांगले शिक्षण मिळायला हवे, ही आमची भूमिका आहे. शिक्षकांची संख्या कमी असली तरी मुख्याध्यापक व शिक्षकांनी शोधलेला पर्याय कौतुकास्पद आहे. त्यांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करूच तसेच शिक्षक मिळवण्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरूच आहे."

- एकनाथ साताळकर, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

Nagde : Temporary teachers from teachers' families present for teaching in primary school.
Nashik News : जिल्ह्यात 250 शिक्षकांचे निवृत्तिवेतन थकले; पालकमंत्र्यांसमोर केंद्रप्रमुख संघाची कैफियत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com