Nashik News : नुसता सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नव्हे !

सर्दी, खोकला, ताप आल्यास समोरच्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा किंवा त्याची लक्षणे आहेत, असा संशय बळावतो.
Cold Cough Patient
Cold Cough Patientsakal

सिन्नर : सर्दी, खोकला, ताप आल्यास समोरच्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा किंवा त्याची लक्षणे आहेत, असा संशय बळावतो. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण अनेक राज्यांत आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने नवीन नियमावली घोषित केली आहे.

आजारी व्यक्ती, शस्त्रक्रिया झालेल्या किंवा ज्येष्ठांना खबरदारी म्हणून मास्क सक्ती केली आहे. ( Dr. MS Bachhav statement of Corona is not just cold and cough nashik news )

तथापि, नव्या व्हेरियंटचा संसर्ग होण्याचा प्रभाव कमी आहे. सध्या सर्दी, खोकला, ताप येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामागे ऋतू आणि हवामानातील बदल कारणीभूत आहेत. त्यामुळे आजारी पडलेल्या प्रत्येकाला कोरोनाच झाला आहे, या नजरेतून पाहणे योग्य नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

मास्क वापरणे आवश्यक आहे, उगाच शंका नको

तीव्र सर्दी, खोकला, छाती भरून येणे, तीव्र ताप ही कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. प्रत्येक व्यक्तीला हंगामात सामान्यपणे किमान दोन वेळा सर्दी किंवा ताप येतो. या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. शंका वाटल्यास कोरोनाची चाचणी करायला हवी, मात्र या स्वरुपाच्या व्यक्ती समोर आढळून आल्यास त्यांना कोरोना झाल्याची शंका व्यक्त करणे योग्य नाही.

Cold Cough Patient
Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील 32 आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती

यातून अकारण भिती वाढून सामाजिक धोका निर्माण होऊ शकतो. सर्दी, ताप असलेल्या व्यक्ती घाबरून घरात बसतात. यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होतो. निदान करणे जरुरी असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी सांगितले.

भीती नको, खबरदारी मात्र नक्की घ्या

नव्या कोरोनालाघाबरण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी अपेक्षित आहे. लहान मुलांसह आजारी रुग्ण, ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आणि आजारी असलेल्यांना तसेच शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना काळजी घ्यावी.

''प्रत्येकाने काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, साबणाने नेहमी स्वच्छ हात धुतले पाहिजे. कोणताही आजार अंगावर काढू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.''- डॉ. एम एस बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी, सिन्नर

Cold Cough Patient
Nashik News: कृत्रिम गतिरोधकामुळे जीवघेण्या अपघाताची शक्यता! जुन्या गंगापूर नाका सिग्नलवरील गंभीर प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com