Nashik News: कृत्रिम गतिरोधकामुळे जीवघेण्या अपघाताची शक्यता! जुन्या गंगापूर नाका सिग्नलवरील गंभीर प्रकार

गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका सिग्नल याठिकाणी काही दिवसांपूर्वी काम करण्यात आले
Artificial Speed Breaker
Artificial Speed Breakeresakal

नाशिक : गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका सिग्नल याठिकाणी काही दिवसांपूर्वी काम करण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी डांबरीकरण करताना उंचवटा निर्माण झाला आहे.

या कृत्रिम गतिरोधकामुळे सिग्नल सुटल्यानंतर जीवघेण्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असून, या कृत्रिमरित्या तयार झालेल्या गतिरोधकाची उंची कमी करण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे. (Possibility of fatal accident due to artificial speed breaker critical incident on old Gangapur Naka signal Nashik News)

गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका येथे सिग्नल यंत्रणा आहे. अशोकस्तंभाकडून गंगापूरकडे जाताना चौकातील दोन्ही रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर, काम झाल्यानंतर त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.

परंतु, डांबरीकरण करताना त्याठिकाणी उंचवटा निर्माण होऊन कृत्रिम गतिरोधक तयार झाले आहे. विशेषत: गंगापूरकडे जाताना आणि गंगापूरकडून अशोकस्तंभाकडे येताना सिग्नल ओलांडून त्याच रस्त्यावर असे हे कृत्रिम गतिरोधक तयार झाले आहेत.

गंगापूरकडे जाताना सिग्नल सुरू झाल्यास जाणारी वाहने वेगात धावतात. त्याचप्रमाणे, गंगापूरकडून अशोकस्तंभाकडे येताना बहुतांशी वेळा वाहने वेगात धावतात. या कृत्रिम गतिरोधकांमुळे त्यावर वाहने आदळून अपघाताची शक्यता बळावली आहे.

Artificial Speed Breaker
Nashik News : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू; पोलीस आयुक्तांकडून अधिसूचना जारी

विशेषत: दुचाकीचालकांना याठिकाणी अधिक धोका निर्माण झाला आहे. गतिरोधक नसल्याने त्यावर पांढरे झेब्रा पट्टे मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकाला पुढे गतिरोधक आहे, याची माहिती नसल्याने त्यावर वेगात आलेली दुचाकी आदळून अपघात होऊ शकतो.

यात वाहनचालकाचा बळीही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील कृत्रिम गतिरोधक काढून त्याठिकाणी रस्त्याला समांतर डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे.

Artificial Speed Breaker
Nashik: नायलॉन मांजा आढळून आल्यास पतंग उडवणाऱ्यावर कारवाई! वावी पोलीसांकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com