Nashik News : वेदांसह संत तुकारामांच्या विचारांची गरज : डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर

समाजाच्या उन्नतीसाठी संतांनी मांडलेले विचार सर्वसामान्य जनतेला कळावे म्हणून उपासक व अभ्यासक यांनी एकत्रितपणे अभंगांचा अभ्यास केला आहे.
Dr Ramakrishna Maharaj Lahvitkar statement of Need of thoughts of Sant Tukaram with Vedas nashik news
Dr Ramakrishna Maharaj Lahvitkar statement of Need of thoughts of Sant Tukaram with Vedas nashik newsesakal

Nashik News : समाजाच्या उन्नतीसाठी संतांनी मांडलेले विचार सर्वसामान्य जनतेला कळावे म्हणून उपासक व अभ्यासक यांनी एकत्रितपणे अभंगांचा अभ्यास केला आहे. साध्या-सोप्या भाषेतील संत तुकारामांचे प्रेरणादायी विचार सर्वांपर्यंत पोचवले जात आहेत.

समाजाला वेदांसह संत तुकारामांच्या विचारांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हभप डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले. (Dr Ramakrishna Maharaj Lahvitkar statement of Need of thoughts of Sant Tukaram with Vedas nashik news)

श्रीमंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता. ४) शहरातील श्रध्दा लॉन्स येथे ‘अभंग पंचविशी’ प्रकाशन सोहळा व ग्रंथदान सोहळा पार पडला.

या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिवव्याख्याते शेख सुभान अली, निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थेचे अध्यक्ष नीलेश गाढवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, विष्णूपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, महिला अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, कार्यक्रमाचे मुख्य संघटक अविनाश काकडे, अध्यक्ष अशोक काळे, पुंडलिकराव थेटे, दत्तुपंत डुकरे, सचिन जाधव, माणिकराव देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

Dr Ramakrishna Maharaj Lahvitkar statement of Need of thoughts of Sant Tukaram with Vedas nashik news
Nashik News : बांधकाम विभागाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत 40 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याची तयारी

संत तुकारामांच्या निवडक २५ अभंगांचा संग्रह असलेल्या ‘अभंग पंचविशी’चे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. ‘वारी आपल्या दारी, श्री संत तुकाराम समर्थ गाथा घरोघरी’ या उपक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा पार पडला.

मंत्री भुजबळ म्हणाले, संत तुकारामांचे अभंग बुडवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण संतांचे विचार कधीही संपत नाहीत. संत तुकारामांनी रचलेले अभंग हे कधीही न भंगणारे आहेत. अंधश्रद्धेला त्यांनी कधीही खतपाणी घातले नाही. पण देवाप्रती आपली श्रध्दा असायला हवी, अशी शिकवण त्यांनी दिली. संतांनीही समाजाचा विरोध पत्करून आपले विचार मांडले. तसेच आपणही प्रयत्न सुरु ठेवले पाहिजे, असे सूचक विधानही भुजबळांनी याप्रसंगी केले.

शेख सुभान अली यांनी संत तुकाराम, तुकडोजी महाराज यांचे अभंग म्हटले. अविनाश काकडे यांनी प्रास्ताविक केले. वारकरी संप्रदायाच्या प्रसारक म्हणून सुनीता गंभिरे, मिनाक्षी मेतकर, प्रभाकर जाधव, नीतू ब्राह्मणकर, मनिषा पुरकर यांना संत तुकाराम गाथा, पगडी व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. वारकरी संप्रदायातील बाल वारकऱ्यांनी अभंग व भावगीते सादर केली.

Dr Ramakrishna Maharaj Lahvitkar statement of Need of thoughts of Sant Tukaram with Vedas nashik news
Nashik News : डंपिंग ग्राऊंडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; स्थलांतरीत करण्याची मागणी

आम्ही वेगळ्या व्यासपीठावरचे ‘वार’करी

मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच म्हणाले की, हा मंच आमचा नाही. आमचे स्टेज वेगळे असते. आमच्यातील वारही दुसरेच चालतात. त्या व्यासपीठावरचे आम्ही ‘वार’करी असल्याचे सांगतात सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

सर सलामत तो पगडी पचास

‘वारी आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वारकरी संप्रदायाची पगडी घातली जात होती. भुजबळांचे भाषण सुरू असतानाच आमदार कोकाटे व्यासपीठावर दाखल झाले.

त्या ठिकाणी बसलेले नरहरी झिरवाळ यांनी लागलीच शेजारी ठेवलेली पगडी उचलली आणि कोकाटेंच्या डोक्यात घातली. पण कोकाटेंनी लगेज ती बाजूला सारली, जणू ‘सर सलामत तो पगडी पचास’ असेच त्यांना म्हणायचे असेल. दोघांमध्ये हास्यविनोदही झाला.

Dr Ramakrishna Maharaj Lahvitkar statement of Need of thoughts of Sant Tukaram with Vedas nashik news
Nashik News : उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा : गीतांजली किर्लोस्कर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com