Nashik Water Crisis: येवल्याच्या भाळी पुन्हा दुष्काळ! 8 वर्षांतील सर्वांत कमी पाऊस

Onions withered in the field due to lack of water
Onions withered in the field due to lack of wateresakal

येवला : तालुक्यात यंदा अल्प पावसाने पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा तालुक्यात सरासरी केवळ ३२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, २०१८ नंतर म्हणजेच पाच वर्षांनी दुष्काळाचा टिळा पुन्हा येवलेकरांच्या माथी लागला आहे.

२०१५ नंतर दुष्काळाच्या माहेरघरी आठ वर्षांतील सर्वांत कमी पावसाची यंदा नोंद झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला. मात्र, एकही उपाययोजना लागू न केल्याने अन्नधान्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. (Drought again soon Lowest rainfall in 8 years Nashik Water Crisis)

ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण असलेल्या डोंगराळ तालुक्यात दोन-तीन वर्ष उलटले, की दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. राज्यातील ब्रिटिशकालीन ९४ दुष्काळी तालुक्यांच्या यादीत येवल्याचे नाव सर्वांत वर आहे. भौगोलिकदृष्ट्या तालुक्याची दोन भागांत विभागणी झाली आहे.

उत्तर पूर्व भाग डोंगराळी व आवर्षणप्रवण असल्याने या भागात नेहमीच पावसाचे प्रमाण अल्प असते. त्या तुलनेत पश्चिम भागात पाऊस काहीसा आधार देतो. या वर्षी पूर्ण तालुका पावसाने कोरडा ठेवल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

यापूर्वीच्या दुष्काळात किमान खरिपाचे पीक २५ ते ४० टक्के शेतकऱ्यांच्या हाती येत होते. २०१८ मध्येही हा अनुभव आला होता. या वर्षी पूर्ण खरिपाची शेतातच माती झाल्याने गुंतवलेल्या भांडवलला चुना लागला आहे.

पाणी असलेल्या, तसेच आठ ते दहा गावांत चांगला पाऊस झाल्याने तेथे खरिपाची पिके निघाली, पण रब्बी नावालाही दिसणार नाही. पालखेड डाव्या कालव्याच्या भरोशावर पश्चिम भागातील काही गावांत कांदालागवड झाली आहे. याव्यतिरिक्त सर्वत्र दुष्काळाचा हाहाकार आहे.

फक्त ६३ टक्केच पाऊस

तहसील कार्यालयाच्या नोंदीनुसार तालुक्याची पर्जन्याची वार्षिक सरासरी ४३३ मिलिमीटर असून, या वर्षी केवळ ३२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात पेरणी केल्यावरही खाली जमीन कोरडीच होती.

भूजल पातळी प्रचंड खालवल्याने जलस्त्रोतही कोरडे पडले आहेत. उत्तर पूर्व भागात पावसाळ्यातही विहिरींना पाणी उतरले नाही.

आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. किंबहुना एप्रिलमध्ये सुरू झालेले टँकर अद्यापही सुरू असून, किमान ५० गावे व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Onions withered in the field due to lack of water
Jalna Water Crisis : साडेतीनशे गावांवर दुष्काळाची छाया; जालना जिल्ह्यात ६२ टॅंकर सुरू, सार्वजनिक स्रोतांमधून उपशाला प्रतिबंध

दुष्काळ पाचवीलाच पुजलेला

येवलेकरांच्या नशिबी दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आहे. तीन-चार वर्षे गेले, की वरुणराजा रूसतो अन्‌ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होते. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून डोक्यावर कर्जाचे ओझे पडते, असा पूर्वानुभव आहे.

२०१८ मध्ये दुष्काळ पडला होता. पुन्हा या वर्षी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. पिके शेतातच मातीत गेले. परिणामी, खरिपासाठी उचललेले भांडवल कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकला आहे.

उत्तर पूर्व भागात एकाही पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हाती न आल्याने येणाऱ्या दहा-बारा महिन्यांचा प्रश्न घेऊन शेतकरी जगत आहेत.

कोणते आकडे खरे...

तहसील कार्यालयाच्या नोंद केलेल्या पर्जन्यवारीच्या आकड्यात आणि शासनाच्या महारेन संस्थेच्या आकडेवारीत तफावत असल्याने कोणती आकडेवारी खरी हा प्रश्नही आहे. तालुक्यात सर्वांत कमी पाऊस राजापूर मंडलात झाला आहे.

या भागात टँकरची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या राजापूरमध्ये चार टँकर सुरू असून, अजून टँकरची मागणी होत आहे.

या वर्षी असा पडला पाऊस

मंडल- तहसीलची नोंद- महारेनची नोंद

येवला- ४५७- ४०९

अंदरसूल- ३५३- ५८५

नगरसूल- २५६- ४३९

पाटोदा- ३१३- ३६८

सावरगाव- ३५०- ४२५

जळगाव नेऊर- २५०- २६२

अंगणगाव- ००- ३११

राजापूर-००- १९३

२०१५ नंतर येवल्यात पडलेला पाऊस

वार्षिक सरासरी- ४३३ मिलिमीटर

२०१५-३२४

२०१६- ५१७

२०१७-४६२

२०१८-४३१

२०१९- ६४८

२०२०-७४४

२०२१-६८२

२०२२- ७२४

२०२३- ३२९

Onions withered in the field due to lack of water
Nashik Water Crisis: जिल्हा टंचाई कृती आराखडा 10 कोटीने वाढणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com