esakal | कुत्ता गोळी विक्री करणाऱ्याला मालेगावात अटक; २४ पाकिट गोळ्या जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

drugs

कुत्ता गोळी विक्री करणाऱ्याला अटक; २४ पाकिट गोळ्या जप्त

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात नशेसाठी गुंगीच्या औषधे, गोळ्यांचा विनापरवाना साठा करून सर्रास वापर होणाऱ्या कुत्ता गोळीची (Alprazolam) विक्री करणाऱ्या जफर आबीद अन्सारी (२६,रा. निहालनगर) याला शहर पोलिसांनी अटक केली. गोळी विक्री प्रकरणातील संशयित मोबीन गर्रा (रा. रमजानपुरा) फरार झाला आहे. पोलिसांनी जफरच्या ताब्यातून साडेपाचशे रुपये किंमतीच्या २४ गोळ्यांचे पाकिटे जप्त केले आहेत.

गुंगीच्या औषधे, गोळ्यांचा विनापरवाना साठा केल्या प्रकरणी जफर व मोबीन विरुद्ध अन्न औषध प्रशासनाचे प्रशांत ब्राह्मणकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.८) दुपारी शहरातील हुडको कॉलनीतील ख्वाॅजा गरीब नवाज हॉलच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली. गोळी विक्री प्रकरणातील संशयित मोबीन गर्रा या फरार संशयिताचा शोध सुरु आहे. अधिक्षक सचिन पाटील, अपर अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश घुसर, सहाय्यक निरीक्षक सावजी, उपनिरीक्षक एस. वाय. आहेर व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरीजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार

हेही वाचा: कोरोनाच्या नावाखाली होऊ द्या खर्च!

loading image
go to top