esakal | मद्यधुंदीत ‘लेडी डॉन’ची पोलिसांनाच शिव्यांची लाखोली! नाशिकमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

police

नाशिक : मद्यधुंदीत ‘लेडी डॉन’ची पोलिसांनाच शिव्यांची लाखोली!

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : काही दिवसांपासून सिडको परिसरात खून, हाणामारी, बलात्कार यासारख्या घटना ताज्या असतानाच बुधवारी (ता.२९) रात्री दिव्या ॲडलॅब परिसरात नेहमीचा वावर असणाऱ्या ‘लेडी डॉन’ने मद्यप्राशन करत कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच शिव्यांची लाखोली वाहत धिंगाणा घातल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेणाऱ्या उपस्थित नागरिकांसाठी हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे. काय घडले नेमके?

दहशत अन् भाईगिरीचा अड्डा

काही वर्षांपूर्वी सिडको परिसर म्हणजे दहशतीचा अड्डा म्हणून ओळखला जात होता. येथे विविध टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय होत्या. परंतु, त्यानंतर अंबड पोलिस ठाण्याला सुदैवाने लागोपाठ दोन ते तीन खमके अधिकारी लाभले. त्यात दिनेश बेर्डेकर, मधुकर कड, सोमनाथ तांबे आदींनी गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळत कंबरडे मोडण्याचे काम केले. गुन्हेगारांची परिसरातून धिंड काढणे, मोकासारख्या कारवाया करणे, गुन्हेगारीच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना सहकार्य करणाऱ्या राजकीय गॉडफादरच्यादेखील नाड्या ठेचण्याचे काम केले. त्यानंतर बरेच वर्ष येथे गुन्हेगारीमुक्त वातावरण बघायला मिळाले. एवढेच नव्हे तर तेव्हापासून आतपर्यंत भाईगिरी या शब्दाचे पतन झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे नागरिकांनीदेखील अशा अधिकाऱ्यांना अक्षरशः डोक्‍यावर घेत गौरव केला. एवढेच नाही, तर त्यांची बदली रद्द करण्यासाठीदेखील वरिष्ठ स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे दिसून आले.

हेही वाचा: कांदेंकडून भुजबळांवर ताणलेली बंदूक शिवसेना की राष्ट्रवादीची?

आजही परिसरात अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडल्यानंतर नागरिक अधूनमधून त्यांची आठवण काढतात. आज पुन्हा एकदा अशा अधिकाऱ्यांसारखी कणखर भूमिका विद्यमान पोलिस अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांत व्यक्त होताना दिसत आहे. आता डॉनपाठोपाठ ‘लेडी डॉन’ने सिडको परिसरात मद्यप्राशन करून घातलेला गोंधळ व पोलिसांना वाहिलेली शिव्यांची लाखोली यामुळे सिडको परिसर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर प्रशासनाने आता कणखर भूमिका घेण्याची गरज आहे.

हेही वाचा: केंद्र सरकारचा मोठा झटका, CNG सह पाईप गॅसही महागणार

loading image
go to top