video call 2.jpg
video call 2.jpg

CoronaVirus : "भारतात येण्याचे नियोजन आम्ही रद्द केले...आता सोशल मीडियावरूनच काळजी घेतो"

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. रोज हा विषाणू आणखी वेगाने पसरत आहेत. काही देशांमध्ये तर घराबाहेर पडणे कठीण झाले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमधील जे तरुण परदेशात नोकरीसाठी गेले आहेत, त्यांच्याशी कोरोनाबाबत संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतात तसेच परदेशात राहणारे प्रत्येकजण एकमेकांची काळजी करत आहेत. नातेवाईक रोज तसेच घरच्यांशी संवाद साधला जात असल्याने भावनिक ओलावा निर्माण झाला आहे. भारतात येण्याचे नियोजनदेखील आम्ही रद्द केले असून, सोशल माध्यमातूनच एकमेकांशी संवाद साधत काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

परदेशातील नाशिककरांना कुटुंबीयांचा मिळतोय आधार 
आठवड्यापासून घरूनच ऑफिसची कामे करत आहेत. मुलांना शाळेला सुटी आहे. मात्र मुलांची ऑनलाइन शाळा सुरू राहणार आहे. यात घरूनच मुले शाळेच्या पोर्टलवर कनेक्‍ट होतील. त्या ठिकाणी मुलांना अभ्यास दिला जाईल. शाळेच्या शिक्षकांशी ऑनलाइन संवादही साधता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव तर आहेच; पण सर्व मिळून एकत्रितपणे लढा दिला जात आहे. - पंकज गवांदे, न्यू जर्सी, अमेरिका 62906 
 
मी ज्या शहरात राहतो, तेथे पंधरा दिवसांपासून आम्ही घरूनच काम करत आहोत. आमच्या भागातील कोरोनाचा सर्वांत पहिला बळी माझ्याच शहरात नोंदवला गेला. आजपर्यंत माझ्या राज्यात सहाशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातील 37 रुग्ण एका वृद्धाश्रमातील असून, तो माझ्या घरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. पण त्याचा सामना केलाच पाहिजे. सुदैवाने मी इथे एकटाच आहे, माझे कुटुंबीय भारतात आहे. संसर्ग टाळण्यासाठी आम्ही इतरत्र जाणे टाळतो. सार्वजनिक ठिकाणी जात नाही. काम असेल तरच बाहेर पडतो. - पी. समीर, सीएटल, वॉशिंग्टन 

आठवड्यापासून घरूनच काम सुरू आहे. पुढील काही आठवडेही घरूनच काम करावे लागेल. कार्यालयामार्फत दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. पुढील तीन आठवडे शाळांना सुटी आहे. मुलांसाठी ई-लर्निंगचा पर्याय वापरता येईल का? याबाबत शाळा प्रयत्न करत आहे. मास्क तसेच सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. मॉल वगैरे बंद असल्याने सुरवातीला किराणा मालासाठी अक्षरशः रांगा लावाव्या लागल्या होत्या. - सचिन यादव, कॅलिफोर्निया 

शाळांना दोन आठवडे सुटी आहे. फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. बाकी मॉल, चित्रपटगृहे यांसह सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. घरात लागणाऱ्या अत्यावश्‍यक वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये अक्षरशः झुंबड उडाली. त्यामुळे दुकानदारांकडूनही साठा केला जाऊ नये म्हणून प्रत्येकाला मोजकाच माल दिला जात आहे. गरज असेल तरच ऑफिसला या नाही तर घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. - मंजू डोखळे, लॉस एंजिल्स 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com