esakal | कोरोनामुळे मुलांनी घरीच केली 'विठ्ठल-रखुमाई' वेषभूषा
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi Ekadashi

कोरोनामुळे मुलांनी घरीच केली 'विठ्ठल-रखुमाई' वेषभूषा

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये अजूनही म्हणावी तशी सुरू झाल्या नसल्यामुळे पालक दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मुलांना विठ्ठल- रखुमाईच्या वेषभूषा करत शाळेत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठवतात. परंतु, यावर्षीही कोरोनामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या वेषभूषा केल्या. परंतु, त्या घरच्या पुरत्याच मर्यादित होत्या. अजूनही अनेक पालक मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नसल्यामुळे यावर्षी आषाढी एकादशीचा उत्सव विधीवत पूजन करून मुलांसोबत घरीच साजरा केला. (due to the corona the children dressed as vitthal-rakhumai at home)


आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी (ता.२०) सकाळी घरासमोर सडा टाकून सुंदर रांगोळी काढली होती. साबुदाणा खिचडी, वडे आदी उपवासाच्या पदार्थांची रेलचेल होती. सोबतच फलाहारही होता. दुपारी संगीत भजनाच्या कार्यक्रमाने सुरवात झाली. विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधीवत पूजन झाले. या वेळी हुबेहूब रखुमाईच्या वेषभूषा केलेल्या मुलींना उभे करण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांनी वेषभूषा केलेल्या बालिकेचेच दर्शन घेतल्याचे दिसून येत होते. अनेक भाविकांनी हातात आणलेले हारफुले वेषभूषा केलेल्या रखुमाईच्या गळ्यात घालत होते. यावर्षीही अनेक भाविकांना दरवर्षी होणारी पंढरपूरची वारी करणे शक्य नसल्यामुळे या भाविकांनी या ठिकाणी भेट देत पंढरपूरच्या वारीचा अनुभव या ठिकाणीच आल्याने साक्षात रखुमाईचे दर्शन झाल्याचा आनंद व्यक्त केला. संगीत भजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद व खिचडी वाटप करण्यात आली.

हेही वाचा: मालेगावात सलग तीन दिवस होणार पाणीपुरवठा

loading image