esakal | मालेगावात सलग तीन दिवस होणार पाणीपुरवठा; स्वच्छतेसाठी विशेष नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon Municipal Corporation

मालेगावात सलग तीन दिवस होणार पाणीपुरवठा

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात बुधवारी (ता. २१) बकरी ईद साजरी होणार आहे. कोरोना संसर्गामुळे सामूहिक नमाजपठणास बंदी असल्याने घरीच नमाजपठण व कुर्बानी करावी, असे आवाहन पोलिस व महसूल प्रशासनाने केले आहे. बकरी ईदसाठी महापालिका व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कुर्बानीच्या जनावरांचा कचरा टाकण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. उद्यापासून शहरात सलग तीन दिवस नियमित पाणीपुरवठा होणार आहे. दैनंदिन स्वच्छतेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. (Malegaon city will have regular water supply for three days in a row)


महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. श्रीमती शेख यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, बांधकाम आदी विभागांचा आढावा घेतला. यानंतर श्रीमती शेख यांनी विभागप्रमुखांना विविध सूचना दिल्या. प्रामुख्याने शहरातील स्वच्छता अबाधित राखावी, साथ आजारांचा प्रादुर्भाव पसरणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. कुर्बानीनंतरचा घाण, मांस, कचरा इतरत्र न टाकता मनपाने निर्धारित केलेल्या ठिकाणांवरील वाहनांमध्ये जमा करावा. रस्त्याने मांस घेऊन जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी. सणाच्या कालावधीत वेळोवेळी फवारणी करावी. पथदीप सुस्थितीत सुरू ठेवावे. सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावे. धोकादायक इमारतीमालकांना सूचना व नोटीस द्यावी. स्वच्छतेबाबत तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी.

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

सभागृहनेते अस्लम अन्सारी, प्रभाग क्रमांक तीनचे सभापती अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त राहुल पाटील, लेखाधिकारी राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, वैभव लोंढे, अनिल पारखे, शहर अभियंता कैलास बच्छाव, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, अग्निशमन अधीक्षक संजय पवार, उपअभियंता जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ, शांताराम चौरे, नगररचनाकार संजय जाधव, प्रमुख स्वच्छता निरीक्षक अमित सौदे, आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ शेख, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, संगणक विभागप्रमुख सचिन महाले, सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

(Malegaon city will have regular water supply for three days in a row)

हेही वाचा: रिलायन्स, इंडियन ऑइलची नाशिकमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

loading image