Nashik News: गावबंदी केल्याने चिमुकलीचा मृतदेहासह नातेवाईक पोलीस आयुक्तालयात! खासदार गोडसेंच्या गावातील प्रकार

गावकऱ्यांनी गावबंदी घातल्याचा आरोप करीत चिमुकलीच्या मृतदेहासह नातेवाईक शनिवारी (ता. २०) दुपारी थेट गंगापूर रोडवरील शहर पोलीस आयुक्तालयात धडकले.
Relatives carrying the infant's body in an ambulance in front of the City Police Commissionerate on Gangapur Road.
Relatives carrying the infant's body in an ambulance in front of the City Police Commissionerate on Gangapur Road.esakal

नाशिक : संसरी गावातील दोन वर्षीय चिमुकलीचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यु झाला. या चिमुकलीचा पिता दोन गटातील मारहाणीमध्ये पोलीसांच्या ताब्यात होता.

या वादातून गावकऱ्यांनी गावबंदी घातल्याचा आरोप करीत चिमुकलीच्या मृतदेहासह नातेवाईक शनिवारी (ता. २०) दुपारी थेट गंगापूर रोडवरील शहर पोलीस आयुक्तालयात धडकले.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मधस्थी केल्यानंतर चिमुकलीवर संसरी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, सदरचा प्रकार नाशिकचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांच्याच गावात घडल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. (Due to village ban child body relatives in Police Commissionerate incident in MP Godse sansari village Nashik News)

संसरी गावामध्ये गेल्या बुधवारी (ता. १७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाहनाच्या पार्किंगवरून दोन गटामध्ये हाणामारी झाली.

यात सागर धनंजय गोडसे (रा. संसरी गाव) याच्या फिर्यादीनुसार, हर्या उर्फ हर्षद त्रिभुवन (२४) याच्यासह आठ-दहा जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणात हर्षद त्रिभुवन यास ताब्यातही घेतले आहे.

दरम्यान, हर्षद याची अवघ्या दोन वर्षांची मुलगी निहारिका ही आजारपणामुळे बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. गेल्या शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

तिच्यावर संसरी गावातच अंत्यसंस्कार करण्याऐवजी नातेवाईक चिमुकलीच्या मृतदेहासह रुग्णवाहिका घेऊन थेट गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचीही धावाधाव झाली.

वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त आनंदा वाघ, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना शांत केले.

पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर चिमुकलीवर दुपारनंतर संसरी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे आश्वासन पोलिसांनी नातलगांना दिले होते.

Relatives carrying the infant's body in an ambulance in front of the City Police Commissionerate on Gangapur Road.
Nashik Police: शहर पोलिसांचे परिमंडळ दोनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन! सराईत गुन्हेगारांची धरपकड अन अवैध दारुसाठा जप्त

गावबंदीचा आरोप

दरम्यान, दोन गटाच्या हाणामारीमध्ये एकाच गटाची फिर्याद नोंदवून घेत, आमची फिर्याद न घेतल्याचा आरोप नातलग व नागरिकांनी केला.

तसेच, हाणामारीनंतर त्रिभूवन यांच्या घराला गावकऱ्यांनी कुलूप लावून घेत गावात येऊ दिले नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचा आरोप या नातलग व नागरिकांनी केला आहे.

"मयत चिमुकलीच्या नातलगांनी तिचा पिता हर्षद यास अंत्यसंस्कारासाठी आणण्याबाबत विनंती केली असता ती मान्य केली होती. परंतु, नंतर त्यांनी संपर्कही साधलेला नाही. मात्र गावात कोणताही तणाव निर्माण न होता अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. तसेच, हाणामारीप्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत."

- संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवळाली कॅम्प

Relatives carrying the infant's body in an ambulance in front of the City Police Commissionerate on Gangapur Road.
Nashik News: जुनी पेन्शनप्रश्नी उपोषण थांबविण्यासाठी दबाव; पेन्शन संघटना राज्याध्यक्ष, पदाधिकारी सोमवारी नाशिकमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com