Insurgents detained during combing operation in circle two. Another photo shows the suspect and illegal liquor seized in the suburbs
Insurgents detained during combing operation in circle two. Another photo shows the suspect and illegal liquor seized in the suburbsesakal

Nashik Police: शहर पोलिसांचे परिमंडळ दोनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन! सराईत गुन्हेगारांची धरपकड अन अवैध दारुसाठा जप्त

पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोनमध्ये पुन्हा टवाळखोरांनी डोके वर काढल्याने, आगामी महत्त्वाच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोनमध्ये पुन्हा टवाळखोरांनी डोके वर काढल्याने, आगामी महत्त्वाच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

यादरम्यान पोलिस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात येऊन १७२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. (Nashik City police combing operation in circle 2 Arrest of inn criminals and confiscation of illegal liquor stock news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी यांनी अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

अचानक राबविण्यात आलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले.

या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीसांनी रेकॉर्डवरील १२३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून कारवाई करण्यात आली.

तर, १७२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांच्या घरझडतीमध्ये धारदार हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.

Insurgents detained during combing operation in circle two. Another photo shows the suspect and illegal liquor seized in the suburbs
Nashik Police : शहर पोलिसांची आता पायी पेट्रोलिंग! आयुक्तांची संकल्पनेतून प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश

उपनगरला अवैध मद्यसाठा

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना वैदूवाडीत देशी-विदेशी बनावट दारुची अवैधरित्या विक्री करताना शंकर गुरु लोंखडे (३७, रा. वैदूवाडी, समतानगर, आगार टाकळी) यास उपनगर पोलिसांनी अटक केली.

त्याच्याकडून ६ हजार ३९० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्यासह पथकाने केली.

Insurgents detained during combing operation in circle two. Another photo shows the suspect and illegal liquor seized in the suburbs
Nashik Police Transfer: पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात पुन्हा फेर‘बदल’! बदल्यांमुळे काहीं अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com