नागपंचमीचा खास 'झोका' बघितला का मंडळी? वाचा 'या' झोक्यामागील कहाणी..

nagpanchmi.jpg
nagpanchmi.jpg

नाशिक : (निफाड) नागपंचमीला ग्रामिण भागात झोक्यांचे वेगळे महत्व...मात्र आता डेरेदार वृक्ष आणि त्याखाली असणारे झोके झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला म्हणत उंच झोका घेण्याची परंपरा अन् त्याभोवती पिंगा घालणाऱ्या मित्र - मैत्रिणी हे चित्र बदलले आहे. वृक्षतोडीचे लोन वाढत गेल्याने झाडांअभावी झोके जेसीबी मशिनला बांधण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडत तो फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यावर अजुनही वेळ गेली नाही. झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला आहे.

झाडे लावा, झाडे जगवा संदेश समाजमाध्यमात व्हायरल...

श्रावण महीना हा भारतीय संस्कृती धार्मिक व्रत वैकल्यांसाठी महत्वाचा त्यात महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात श्रावणातला पहिला सण म्हणुन नागपंचमीचे वेगळे महत्व आहे. या दिवशी महिला वर्गात वारुळाची पुजा केल्यानंतर सर्व मैत्रिणी गावातील वड, पिंपळ, लिंब अशी डेरेदार झाड शोधायची अन् त्यावर जाड दोराचा (नाडा) झोका बांधत दिवसभर झोका खेळायच्या. यात कुणाचा झोका कीती उंचावर जायचा याच्या स्पर्धा देखील रंगायच्या. त्या निमित्तानं झोक्यावर आधारीत महिला वर्ग गाणे म्हणायच्या. त्यामुळे ऐक वेगळी अनुभुती निर्माण झाल्याचे चित्र असायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. गाव गाड्याचा अविभाज्य असणारी डेरेदार वृक्ष कालौघात गडप झाली आहे. 

कवि प्रकाश होळकर यांच्या कवितेत म्हटल्या प्रमाणे...

माझे अभाळ तुला घे...तुझे अभाळ मला..आठवांच्या पारंब्याला बांधु ऐक झुला...तो फक्त आठवापुरताच उरला आहे. त्यामुळेच निफाड तालुक्याच्या खासकरुन निफाड, पिंपळगाव, ओझर सुकेणा, देवगाव, लासलगाव, उगावसह ग्रामिण भागात प्रत्येक घरात आणि मोठ्या झाडांवर दिसणारे झोके दिसेनासे झाले. असुन निफाडच्या सोशल मिडीयावर जेसीबी मशिनला बांधलेला झोका आणि त्यावर झोका घेण्यास तत्पर असणारी भगिनी आणि अजुनही वेळ गेली नाही. झाडे लावा सांगणारा संदेश बरेच काही सांगुन जाणारा आहे. वृक्षतोड, आधुनिकरण, डिजीटल क्रांती यामध्ये सणांची पारंपारिकता नष्ट होत आहे.

आजच्या नव्या पिढीला झाडाला झोका बांधून खेळणे ही संकल्पना काल्पनिक वाटू लागली. अर्थात याला कारण त्यांनी झोका गॅलरीत, खिडक्यांच्या ग्रीलला असा बघितला. तेव्हा आपल्या सणांच्या पारंपरिकतेचे संर्वधन करणे गरजेचे आहे. जेसीबीला बांधलेल्या ५० लाखाच्या झोक्याला आमच्या झाडाच्या झोक्याची सर नाही आणि मजा पण नाही. - डॉ. वृषाली गागरे पाटील-जाधव.

झाड लावणे आपले कर्तव्य आहे. वड, पिंपळ यासारखे वृक्ष जर लावले तर सावली तर देतातच, ते आपले रक्षण करतात. झोका आणि झाड ऐक समिकरण आहे. निसर्गाच्या सान्निध्याचा आपण मनमुराद आनंद लुटू शकतो. त्यासाठी जेसीबीला झोका बांधण्याची वेळ पुढच्या पिढीला नक्कीच येणार नाही. - प्रा. सिमा सोनवणे, निफाड

(संपादन - किशोरी वाघ)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com