esakal | Nashik Crime | महिलांनो, नवरात्रोत्सवात दागिने साभांळा…!
sakal

बोलून बातमी शोधा

Chain-Snaching

महिलांनो, नवरात्रोत्सवात दागिने साभांळा…!

sakal_logo
By
विनोद बेदरकर


नाशिक : नवरात्रोत्सवात दर्शनासाठी महिलांची गर्दी होऊ लागल्याने चोरट्यांकडून महिलांच्या अंगावरील दागिणे लक्ष्य केले जात आहे. सोनसाखळ्या ओरबाडून नेण्याचे प्रमाण नवरात्रोत्सवात वाढले आहे. गुरुवारी (ता.७) दिवसभरात लागोपाठ तीन घटनांत अडीच लाखांचे दागिणे ओरबाडले. नवरात्रात शहर- परिसरातील विविध मंदिरात महिलांचा वावर वाढला आहे. प्रमुख गर्दी होणाऱ्या प्रमुख मंदिरात दर्शनाला निर्बंध असले तरी, इतरत्र मात्र लहान- मोठ्या मंदिरात असे निर्बंध नाहीत. त्यामुळेच चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील दागिणे ओरबाडण्यास सुरवात केली आहे.


शहरात गुरुवारी (ता.७) दोन घटनांत महिलांच्या अंगावरील दागिने लंपास झाले. मागील महिन्यात साठ घटना घडल्या असताना या महिन्यात पुन्हा नवरात्रोत्सवापासून दागिने ओरबाडण्यास सुरवात झाली आहे. शरणपूर रोडवरील कल्पना दिलीप येवले या गुरुवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ६२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत. दुसरी घटना नाशिक रोड भागात घडली. नाशिक रोडला मोटवाणी रोड भागात श्वेता मकरंद पिसोळकर (रा. आनंद सोसायटी) या गुरुवारी सायंकाळी मैत्रिणीसोबत दर्शनासाठी गेल्या होत्या. फिलोमिना शाळेसमोरून पायी जात असताना दुचाकीवरील दोघांपैकी एकाने पिसोळकर यांच्या गळ्यातील१ लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.

हेही वाचा: दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश


कामटवाड्यातील अभियंता नगर भागात ललिता यशवंत जाधव (रा. शिवतीर्थ कॉलनी) या सायंकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. पाठीमागून तोंडास रुमाल बांधून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाढू लागली आहे. रोज एक- दोन घटना घडत असल्याने महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून, सर्वत्र भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा: विरोधकांच्या नातेवाईकांवर छापे टाकणे हा अतिरेक : छगन भुजबळ

loading image
go to top