Vehicle E Auction : थकीत कर वाहनांचा 22 ला लिलाव

e auction news
e auction newsesakal

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर (Tax) न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या १४ वाहनांचा २२ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता जाहीर ई- लिलाव करण्यात येणार आहे. (e auction of overdue tax vehicle on 22 feb nashik news)

या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी २० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे. जाहीर ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी १५ ते २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे २० हजार रुपये रक्कमेचा आरटीओ, नाशिक या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) व एक हजार रुपये लिलाव शुल्कासह नाव नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

e auction news
Valentine's Day Special : सर्कसवर निखळ प्रेम करणारे बबली चाचा! 40 वर्षांपासून प्रेक्षकांचे करताहेत मनोरंजन

लिलाव करण्यात येणारी वाहने राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, पेठ रोड, नाशिक येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून या लिलाव प्रक्रियेत जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे.

वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अडकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्‍त्यावर पोच देयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. या जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती १५ फेब्रुवारीपासून www.eauction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

e auction news
Success Story : एक हात नसला तरी पायात पदक मिळवण्याचे बळ; पेठचा दिलीप गावीत तरुणाईसाठी Icon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com