यंदा घरोघरी बाप्पाचा देखावा असणार Eco-friendly!

Eco-friendly Ganpati decoration
Eco-friendly Ganpati decorationesakal

नाशिक : घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या सजावटीसाठी कागद, कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फूल आणि आकर्षक व रेखीव विविध प्रकारच्या साहित्याला पसंती दिली जात आहे. कागद, कापडाद्वारे तयार करण्यात आलेल्या फुलांना मागणी असून, प्लॅस्टिकपासून बनलेल्या फुलांना ग्राहकांनी नापसंती दर्शवली आहे. नियमितपणे होणाऱ्या जनजागृतीमुळे प्रदूषण करणाऱ्या, तसेच प्लॅस्टिक, थर्माकोल वस्तूंचा वापर टाळत ‘इको- फ्रेंडली’ (Eco-friendly) सजावटीच्या साहित्याला ग्राहकांची मागणी असल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य

शहरातील दहीपूल, आरके, शालिमार, गंगापूर रोड यासह शहरात ठिकठिकाणी विविध कागद व कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फूल विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. गणपती सजावटीसाठी ग्राहकांची कापडी फुलांना मोठी मागणी आहे. ओसमल कापडापासून फुलांपासून ही फूल तयार करण्यात आले आहे. बाजारात सगळे कापडी फुले असून जरबेरा, गुलाब, जास्वंद, चेरीब्लॉसंन, ऑर्केस्टिक, अनंथेरियम, लिली, निशिगंधा, आर्टिफिशियल मेट, लोन आहेत. सात इंच पासून चाळीस इंचापर्यंत मोतिहार असून दहा इंच ते पन्नास इंचापर्यंत ग्रीनव्हेल, फुलपान घेण्यासाठी ग्राहकांचा कल आहे. पन्नास रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत फुलांचे हार उपलब्ध असून, वेलवेटच्या हाराला ग्राहकांची पसंती मिळत असून, किंमत १४० रुपयांपर्यंत आहे. गणेशोत्सवात सजावटीच्या वस्तूंना प्रचंड मागणी असते. सहा दिवसांवर आलेल्या गणरायाच्या आगमनासाठी भक्त सजावट करण्याला प्राधान्य देत आहे. बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यातच शनिवार सुटीचा वार असल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. कोरोनाची भीती दूर करत कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सवात बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Eco-friendly Ganpati decoration
हेल्मेट नसेल तर वाहन जप्त; चालकांचे सक्तीने होणार समुपदेशन
बाजारात जरबेरा, गुलाब, जास्वंद, चेरीब्लॉसंन, ऑर्केस्टिक, अनंथेरियम, लिली, निशिगंधा, आर्टिफिशियल मेट, लोन फुले उपलब्ध असून, सात इंचा पासून चाळीस इंचापर्यंत मोतिहार आहेत. दहा इंच ते पन्नास इंचापर्यंत ग्रीनव्हेल, फुलपान घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
बाजारात जरबेरा, गुलाब, जास्वंद, चेरीब्लॉसंन, ऑर्केस्टिक, अनंथेरियम, लिली, निशिगंधा, आर्टिफिशियल मेट, लोन फुले उपलब्ध असून, सात इंचा पासून चाळीस इंचापर्यंत मोतिहार आहेत. दहा इंच ते पन्नास इंचापर्यंत ग्रीनव्हेल, फुलपान घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. esakal

मागील नुकसान भरून निघण्याची आशा

''गणेशोत्सव काही दिवसावर आला असून, सजावटीसाठी कापडी फुलांना मागणी आहे. कोरोनामुळे अजूनही व्यवसाय पूर्वपदावर आलेला नसला तरी गणेशोत्सवात मागील नुकसान भरून निघेल अशी आशा आहे.'' - प्रकाश बारी, व्यावसायिक

Eco-friendly Ganpati decoration
तिसऱ्या लाटेचे संकेत; महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com