esakal | नाशिकचा धान्य गैरव्यवहार ईडीच्या रडारवर! घोरपडे बंधूच्या १७७ कोटीच्या मनी लॉड्रींगची चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

ed.jpg

राज्यात यापूर्वीच घोरपडे बंधूवर मोर्क्कातगत कारवाई झाली आहे. सरकारी गुदामातील धान्य काळ्या बाजारात विक्री प्रकरणी सुरु असलेल्या या कारवाईत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहे.

नाशिकचा धान्य गैरव्यवहार ईडीच्या रडारवर! घोरपडे बंधूच्या १७७ कोटीच्या मनी लॉड्रींगची चौकशी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी नागपूर येथील डायरेक्टर ऑफ इन्फोरसमेंट (ईडी) तर्फे चौकशी सुरु झाली असून सिडकोतील संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे 
आणि विश्वास नामदेव घोरपडे या तीन्ही घोरपडे बंधूवर मनी लॉड्रींग अंर्तगत ईडीने कारवाई सुरु केली आहे. १७७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरण पून्हा चर्चेत आले आहे. 

घोरपडे बंधूच्या १७७ कोटीच्या मनी लॉड्रींगची चौकशी 

ईडीच्या नागपूर विभागातर्फे घोरपडे बंधूवर बुधवारी (ता.१७) गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात यापूर्वीच घोरपडे बंधूवर मोर्क्कातगत कारवाई झाली आहे. सरकारी गुदामातील धान्य काळ्या बाजारात विक्री प्रकरणी सुरु असलेल्या या कारवाईत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहे. तहसिलदारांपासून तर पुरवठा विभागातील अनेक आधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सरकारी धान्य वितरणाच्या व्यवस्थेत गौरव्यवहार 
करुन संघटितपणे काळ्या बाजारात विक्रीतून मोठी माया जमविल्याचा आरोप आहे. साधारण १७७ कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यामुळे पून्हा एकदा नाशिकमधील धान्य गैरव्यवहार प्रकरण गाजणार आहे.नाशिकला पुरवठा विभागात गेल्या नउ दहा वर्षातील सत्तरहून आधिक आधिकारी कमर्चाऱ्यांची नावे धान्य काळाबाजार प्रकरणात पुढे येते आहे. 

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

सरकारी धान्याचा काळाबाजार 
सिन्नर येथून वाडीवर्हे मार्गे काळ्या बाजारात सरकारी धान्य विक्रीच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून मोक्का अंर्तगत कारवाई केली आहे. पुरवठा विभागाने ९ वषार्पूर्वी पोलिसांना पत्र देत संपत घोरपडे यांच्यासह काही संशयितावर कारवाईसाठी पत्र दिले होते. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच काळाबाजार प्रतिबंध व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे परीक्षण अधिनियम १९८० च्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण पोलिस कारवाईसाठी प्रयत्नशील होते. त्यार्तंगत वारंवार गुन्हे दाखल झालेल्या सिडकोतील घोरपडे बंधूवर २०१२ पासून कारवाया सुरु होत्या. अखेर आता याप्रकरणात पोलिसांच्या मोक्का कारवायानंतर इडीने कारवायाचा फास आवळला आहे.  

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश

loading image