esakal | संडे-मंडे अंडी खाणाऱ्यांसाठी बातमी! अंड्यांना दुप्पट मागणी पण विक्रीसाठी तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

eggs.jpg

 ‘संडे हो मंडे रोज खाओ अंडे’ याची खऱ्या अर्थाने सध्या प्रचीती येते आहे. कोरोनाची लागण टाळायची असेल अशा प्रत्येकाने किंवा ज्यांना लागण झाली आहे अशा रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन अंड्यांचे सेवन प्रभावी आहे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अनेक रुग्णालयांत उपचारादरम्यान रुग्णांना अंडी खाण्यास दिले जात आहे.

संडे-मंडे अंडी खाणाऱ्यांसाठी बातमी! अंड्यांना दुप्पट मागणी पण विक्रीसाठी तुटवडा

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : ‘संडे हो मंडे रोज खाओ अंडे’ याची खऱ्या अर्थाने सध्या प्रचीती येते आहे. कोरोनाची लागण टाळायची असेल अशा प्रत्येकाने किंवा ज्यांना लागण झाली आहे अशा रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन अंड्यांचे सेवन प्रभावी आहे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अनेक रुग्णालयांत उपचारादरम्यान रुग्णांना अंडी खाण्यास दिले जात आहे.

अंडी येण्याचेही प्रमाण घसरले

कोरोना काळात अंड्यांची नागरिकांकडून दुपटीने मागणी वाढली असली, तरी आवक मात्र ५० टक्क्यांनी घटली. अंडी दरांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी लहान पोट्री व्यवसाय बंद झाले आहेत, तर देशात सर्वत्रच अंड्यांची मागणी होत असल्याने हैदराबाद, गुजरातमधून अंडी येण्याचेही प्रमाण घसरल्याची माहिती व्यावसायिकाने दिली. 

आवक मात्र घटली

वाढत्या रुग्णसंख्येसोबत शहरातच नव्हे तर राज्य आणि देशातही अंड्यांची मागणी दुपटीने वाढली आहे. दुसरीकडे शहरात अंड्यांची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. शहरात जिल्ह्यातील लहान-मोठ्या पोल्ट्रींमधून अंडी विक्रीस येतात. त्याचप्रमाणे हैदराबाद, गुजरातमधूनही अंडी येण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या कधी नव्हे ती अंड्यांची मागणी वाढली आहे आणि आवक मात्र घटली आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

त्यामुळे अंड्यांचा तुटवडा निर्माण 
राज्यातील बहुतांशी अंडी विक्री तेजीत आल्याने स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. केवळ १० ते २० टक्के मालच परराज्यातून येत आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील बहुतांशी लहान पोट्री बंद झाल्या आहेत. दोन्ही कारणांमुळे अंडी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सुमारे चार लाख अंड्यांपेक्षा अधिक अंडी बाजारात येत नाहीत. शहरातील होलसेल व्यावसायिकांना मात्र त्यांचा व्यवसाय टिकून ठेवण्यासह दैनंदिन ग्राहकांना, विक्रेत्यांना अंड्यांचा माल उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यांना काही पोल्ट्रींना अतिरिक्त पैसे मोजून माल खरेदी करावा लागत आहे. त्याचा परिणाम व्यावसायिकांच्या उत्पन्नावर होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे व्यावसायिकाने सांगितले. किरकोळ बाजारात साडेसहा रुपये प्रतिअंडे खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 


शेकडा ५९० ते ६०० रुपये 
डझन ७५ ते ८० रुपये 
प्रतिअंडे ६.५० ते ७ रुपये 


देशात सर्वत्रच अंड्यांची मागणी वाढल्याने परराज्यातून शहरात अंडी विक्रीस येण्याचे प्रमाण घटले आहे. माल उपलब्ध असलेल्या पोल्ट्रींमधून अतिरिक्त पैसे मोजून दैनंदिन विक्रेते आणि नागरिकांना अंडी उपलब्ध करून दिली जात आहेत. -आब्बास शेख, व्यावसायिक  
 

loading image
go to top