CEO Chockalingam
sakal
नाशिक: मतदार याद्यांवरून सध्या राजकारण तापलेले असताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. या वेळी गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत फोटोकॉपी (झेरॉक्स) वर झालेल्या कोट्यवधींच्या अवास्तव खर्चाबाबत त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. तसेच निवडणुकीत फोटोकॉपीसह अन्य बाबींवर झालेल्या अव्वाच्या सव्वा खर्चाबाबत स्पष्टीकरण सादर करावे, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.