esakal | नाशिक : स्मार्टसिटीचे काम करणाऱ्या अभियंत्याला नगरसेवकाकडून मारहाण; पोलिसात तक्रार दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

स्मार्टसिटीचे काम करणाऱ्या अभियंत्याला नगरसेवकाकडून मारहाण

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : धुमाळ पॉइंट ते नेहरू चौकापर्यंत स्मार्टसिटीअंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. कामे लवकर केली जात नसल्याच्या वादातून अभियंत्यास नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह अन्य पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली, असा आरोप अभियंत्याने करत भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शहरात अन्यत्र सुरू असलेली कामे पडली बंद

अनेक महिन्यांपासून दहीपूल ते नेहरू चौक परिसरात स्मार्टसिटीअंतर्गत रस्त्यांच्या कामासह अन्य विविध कामे सुरू आहेत. कामे संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात सोमवारी (ता.१३) रात्री कामे सुरू असताना नगरसेवक गजानन शेलार, चेतन व्यवहारे यांच्यासह अन्य चार जणांनी अभियंता प्रथमेश पाटील यांच्याशी कामे लवकर का केली जात नाही, अशी विचारणा करत वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. शेलार, व्यवहारे अन्य चौघांनी मिळून पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. अभियंता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करत मंगळवारी (ता.१४) त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटील यांना मारहाण झाल्याने त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच शहरात अन्य २४ ठिकाणी सुरू असलेल्या कामावरील कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत सर्व कामे बंद केली आहेत. असाच प्रकार आमच्याबरोबर झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार, सुरक्षा हवी, असे विविध प्रश्न उपस्थित करत कामे बंद केली आहेत. त्यामुळे आधीच संथगतीने काम त्यात काम, कामे बंद झाल्याने कामाचा चांगलाच खोळंबा होणार आहे. त्याचा परिणाम सामान्य व्यावसायिकांवर होणार आहे.

हेही वाचा: नाशिक पोलिसांसमोर नारायण राणे होणार हजर!

हेही वाचा: नाशिक : पोलिस शिपायाकडूनच अल्पवयीन मुलीचे अपहरण

loading image
go to top