Engineering Degree Admission : अभियांत्रिकी पदविका नोंदणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ

 engineering admission
engineering admissionesakal

Engineering Degree Admission : दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीला मुदतवाढ दिलेली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. (engineering degree admission Extension of time for registration nashik news)

गेल्‍या १ जूनपासून पदविका अभ्यासक्रमाच्‍या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता सुरु असलेल्‍या या प्रक्रियेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, या उद्देशाने ही मुदत वाढविली आहे.

यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार शुक्रवारी (ता.३०) मुदत संपत असताना मुदतवाढीचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 engineering admission
Engineer Recruitment : मुंबई पालिकेत अभियंत्यांची भरती करणार; इंजिनिअर्स युनियनच्या मागणीला मंजूरी

याच मुदतीत ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीच्‍या माध्यमातून कागदपत्रे पडताळणी करून घेता येणार आहे.

पुढील टप्यांत १० जुलैला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी ११ व १२ जुलै अशी मुदत दिली जाणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी १४ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्‍यानुसार पुढील प्रवेश फेरीच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत.

 engineering admission
Engineering Admission : अभियांत्रिकीच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com