Nashik News : तरण तलावांची अवाजवी शुल्कवाढ स्थगित; नागरिकांचा रोषानंतर फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

NMC Swimming Pool
NMC Swimming Poolesakal

Nashik News : जलतरण तलावांचा खर्च भागविण्यासाठी आश्रयदाते सभासद, आजीव सभासदांच्या शुल्कात दुपटीने, तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यास त्याच्या शुल्कात चौपट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु नागरिकांचा रोष वाढल्यानंतर अवास्तव दरवाढीचा प्रस्ताव रद्द करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

शहरात महापालिकेचे चार जलतरण तलाव आहेत. (Excessive fee hike of nmc swimming pools suspended nashik news)

या जलतरण तलावांवर आस्थापना, वीज, पाणीबिल, देखभाल दुरुस्तीचा खर्च होतो. तरण तलावांच्या सभासद शुल्कासह अन्य मार्गांनी उपलब्ध होणारे उत्पन्न कमी आहे.

खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ साधण्यासाठी मुख्य लेखा परीक्षकांनी तरण तलावांमधील आश्रयदाते, आजीव सभासद व इतर लेखाशिर्षात तसेच वार्षिक देखभाल शुल्कात अंशतः वाढ सुचविली होती. मिळकत विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव महासभेला सादर करताना दुप्पट ते चौपटीने दरवाढ प्रस्तावित केली.

आश्रयदाते सभासद वार्षिक देखभाल शुल्क ५०० रुपयांवरून १ हजार, आजीव सभासद वार्षिक देखभाल शुल्क ५०० रुपयांवरून ७५० रुपये, आकस्मिक तिकीट प्रौढ ८० वरून १००, आकस्मिक तिकीट लहान ६० वरून ८० रुपये, तर प्रवेश अर्ज ३० वरून ५० रुपये प्रस्तावित करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Swimming Pool
Nashik News : दिव्यांगांच्या मोफत प्रवासी कार्डला या तारखेपर्यंत मुदतवाढ

पोहण्याचे प्रमाणपत्र देण्याचे शुल्कही २५० वरून पाचशे रुपये प्रस्तावित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दूरदर्शन, धारावाहिक व जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी १ तासासाठी दर ६,८३५ वरून ११ हजार, चित्रपट चित्रीकरणाचे दर १०,७१० वरून २२ हजार, शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था क्रीडा स्पर्धांकरिता एक दिवसासाठी आरक्षण शुल्क ४८८५ वरून १६ हजार ५०० रुपये, तर शाळांसाठी १ तासासाठी आरक्षण दर ३,९१० वरून पाच हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु आता दरवाढी संदर्भात सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मिळकत विभागाला देण्यात आले आहे.

दरवर्षी दहा टक्के दरवाढ

सदर दरवाढ दोन वर्षांकरिता प्रस्तावित करण्यात आली होती. या मुदतीनंतर दरवर्षी दहा टक्के दरवाढ केली जाईल, असे प्रस्तावात सूचित करण्यात आले होते. मात्र सदर प्रस्ताव स्थगित करण्यात आल्याने तरण तलावांचे सभासद, हौशी जलतरणपटूंना तूर्त दिलासा मिळाला आहे.

NMC Swimming Pool
Nashik News : महापालिकेच्या वैद्यकीय अधिक्षक पदावर अवैधरीत्या सोनोग्राफी मशिन सापडलेल्या डॉक्टरची नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com