गृहिणींचे बजेट कोलमडणार; तेल तडकले अन् डाळी भडकल्या! सण-उत्सवाच्या तोंडावर महागल्या वस्तू

ration shop.jpg
ration shop.jpg

नाशिक / एकलहरे : नवरात्रोत्सव पंधरवड्यावर आला असताना तेलांसह डाळींच्याही किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे. तर डाळी देखील महागल्या आहेत.परिणामी ऐन सणासुदीच्या दिवसांत गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

तेल तडकले अन् डाळी भडकल्या 

नवरात्रोत्सवात नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो. नवरात्रोत्सवापासून तर पुढे दसरा-दिवाळीपर्यंत तेलाला मागणी असते. सूर्यफूल तेलात लिटरमागे दहा ते पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे. तर सोयाबीनच्या डब्यामागे ५० ते ७५, सूर्यफूल तेलाच्या दरात १५ लिटरमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींमध्ये किलोमागे पाच ते पंधरा रुपयांची वाढ झाल्याने तेल तडकले. परिणामी ऐन सणासुदीच्या दिवसांत गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

सण-उत्सवाच्या तोंडावर वस्तू महागल्या 

कोरोनामुळे रोजगार जाऊन आर्थिक चणचण वाढली असताना वाढत्या महागाईला तोंड देताना अनेक महिलांनी भाजी, खेळणी व प्लॅस्टिक वस्तू विक्रीचा पर्याय निवडला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. डाळींच्या किमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. तर सोयाबीन व सूर्यफूल तेल आयात केले जाते. यात काही अडचणी आल्याने तेलाचे दर वाढले आहेत. 

डाळ एक किलो / सप्टेंबर ऑक्टोबर 
तूरडाळ / ९० ते ९५ ११० ते ११५ 
मूगडाळ / ९५ ते १०० १०० ते १०५ 
हरभराडाळ / ६४ ते ७० ७४ ते ७८ 
उडीदडाळ ९५ ते १०० ११० ते ११५ 
सोयाबीन तेल एक लिटर ९० ते ९८ ११० ते १०५ 
सूर्यफूल एक लिटर ९५ ते १०५ ११५ ते १३० 

यंदा कच्च्या मालाचा तुटवडा व अतिवृष्टीचा फटका उडीद, मूग व तुरीच्या पिकाला बसल्यामुळे डाळींच्या दरात वाढ झाली आहे. -नीलेश कोठारी (घाऊक व्यापारी) 


ऐन नवरात्रीच्या तोंडावर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे गणित बिघडणार आहे. तेल व डाळींच्या दरवाढीला सरकारने लगाम घालावा. -शुभांगी भवर (गृहिणी)  
 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com