YCMOU Recruitment : मुक्‍ततर्फे अर्ज स्‍वीकृतीसाठी गुरुवारपर्यंत मुदतवाढ; कुलगुरू सोनवणेंचा निर्णय

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे सध्या भरती प्रक्रिया सुरु आहे.
YCMOU nashik
YCMOU nashikesakal

Nashik News : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे सध्या भरती प्रक्रिया सुरु आहे. ऑनलाइन अर्ज दाखल केल्‍यानंतर उमेदवारांना विद्यापीठात अर्ज व कागदपत्रे सादर करायचे असताना सोमवारी (ता.२२) सुट्टी आल्‍याने उमेदवारांची गैरसोय होत होती.

यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दखल घेत अर्ज स्‍वीकृती मुदत गुरुवार (ता.२५) पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Extension of deadline till Thursday for acceptance of applications by YCMOU nashik News )

राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या मुक्‍त विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक स्‍तरावरील ॲकॅडमिक कोऑर्डीनेटर’ या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते आहे. करारावरील पदांच्‍या या भरतीप्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरल्‍यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रत विद्यापीठास पाठवायची होती.

त्‍यासाठी सोमवार (ता.२२) पर्यंत मुदत दिलेली असताना, सलग सुट्यांमुळे अर्ज स्‍वीकृतीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती. ६३ जागांच्‍या भरतीसाठी हजारो उमेदवार इच्छुक असल्‍याने कुणावरही अन्‍याय व्‍हायला नको, अशी भावना व्‍यक्‍त होत होती. सलग सुट्या आल्‍याने उमेदवारांना अर्ज निर्धारित मुदतीत पोहोच करणे शक्‍य नव्‍हते.

YCMOU nashik
Nashik News : श्रीराम जन्मभूमी आंदोलन अन् प्राणप्रतिष्ठा

त्‍यामुळे अर्ज स्‍वीकृतीला मुदतवाढ देणे आवश्‍यक असल्‍याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या बातमीची दखल घेताना कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी अर्ज स्‍वीकृती मुदत ३ दिवसांनी वाढविली आहे. त्‍यानुसार आता उमेदवारांना येत्‍या गुरुवार (ता.२५) पर्यंत आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज विद्यापीठात पोहोच करता येतील.

''मुक्त विद्यापीठ भरती प्रक्रियेत मूळप्रत जमा करण्याच्‍या मुदतीमुळे उमेदवारांची गैरसोय होत होती. त्‍यामुळे मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. मुदतवाढ दिल्‍याने विद्यापीठाचे आभार मानतो.''- राजू देसले, सचिव, आयटक.

YCMOU nashik
Nashik News : नैराश्यातून 20 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com