esakal | दिवाळीच्‍या हंगामात महामंडळातर्फे जादा बसगाड्या; प्रवाशांची गैरसोय टळणार
sakal

बोलून बातमी शोधा

st 123.jpg

जादा बसगाड्या उपलब्‍ध झाल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून शुकशुकाट असलेली बसस्‍थानके प्रवाशांनी गजबजली आहेत. सध्याच्‍या परिस्‍थितीत आवश्‍यक ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.  

दिवाळीच्‍या हंगामात महामंडळातर्फे जादा बसगाड्या; प्रवाशांची गैरसोय टळणार

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : दिवाळीच्‍या सणानिमित्त वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. बुधवार (ता. ११)पासून या जादा बसगाड्या सोडण्यास सुरवात झाली असून, येत्‍या २२ नोव्‍हेंबरपर्यंत जादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्‍ध होतील. 

प्रवाशांची गैरसोय टळणार
कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर मास्‍क, सॅनिटायझरसह अन्‍य नियमांचे पालन करून प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे. तसेच महामंडळातर्फे नियमितपणे बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण केले जात असल्‍याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली आहे. नाशिकपासून जिल्ह्यातील तालुक्‍याच्‍या पातळीवरील मोठ्या गावांमध्ये, तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, मुंबई, औरंगाबाद या मार्गांवर ६३ जादा बसगाड्या सोडल्‍या जाणार आहेत. यामुळे प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार असून, सुरक्षित प्रवासाची संधी उपलब्‍ध होणार आहे.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

आवश्‍यक ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन

नाशिक शहरातून जुने सीबीएस, नवीन सीबीएस व महामार्ग बसस्‍थानकाहून बसगाड्या सोडल्‍या जातील. यापैकी महामार्ग बसस्‍थानकाहून कासारा, मुंबई, नगर, सोलापूर व सातारा या ठिकाणांसाठी बसगाड्या सोडल्‍या जातील. नवीन सीबीएस येथून धुळे, जळगावसह पुणे व औरंगाबादकरिता जादा बसगाड्या उपलब्‍ध असतील. जादा बसगाड्या उपलब्‍ध झाल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून शुकशुकाट असलेली बसस्‍थानके प्रवाशांनी गजबजली आहेत. सध्याच्‍या परिस्‍थितीत आवश्‍यक ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.  

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

loading image