esakal | मालेगावमधील बंदोबस्तामुळे ग्रामीण पोलिसांवर अतिरिक्त ताण..परजिल्ह्यातूनही पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण 

बोलून बातमी शोधा

police lockdown malegaon.jpg

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 55 रुग्ण असून, सर्वाधिक मालेगाव शहरात 46 रुग्ण आहेत. त्यामुळे मालेगावमध्ये अधिक सतर्कता बाळगत पोलिस बंदोबस्त वाढविलेला आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात 40 पोलिस ठाण्यांकडील पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी मालेगाव शहरात तैनात केले आहेत.

मालेगावमधील बंदोबस्तामुळे ग्रामीण पोलिसांवर अतिरिक्त ताण..परजिल्ह्यातूनही पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मालेगाव शहरात आहेत. संचारबंदी आदेशाच्या कडेकोट अंमलबजावणीसाठी मालेगावमध्ये ग्रामीण पोलिसांची संख्या वाढविल्याने उर्वरित जिल्ह्याच्या पोलिस बंदोबस्तावर अतिरिक्त ताण आला आहे. मालेगावमध्ये परजिल्ह्यातूनही पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. 

परजिल्ह्यातून राज्य राखीव पोलिसांना पाचारण 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 55 रुग्ण असून, सर्वाधिक मालेगाव शहरात 46 रुग्ण आहेत. त्यामुळे मालेगावमध्ये अधिक सतर्कता बाळगत पोलिस बंदोबस्त वाढविलेला आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात 40 पोलिस ठाण्यांकडील पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी मालेगाव शहरात तैनात केले आहेत. त्यांच्या मदतीला जळगाव, नंदुरबार येथील अतिरिक्त पोलिस व राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्याही दाखल झाल्या आहेत. मालेगाव शहरात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जिल्ह्यातील 502 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत, तर राज्य राखील पोलिस दलाच्या चार तुकड्यांसह जळगाव, नंदुरबार येथील 100 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मालेगाव शहरात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तरीही मालेगाव शहरात जमावबंदीच्या अनुषंगाने आतापर्यंत 187 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर 312 वाहनचालकांकडून 58 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!