नाशिक : ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात कमालीची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cloudy weather in nashik

ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात कमालीची वाढ

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून तप्त उन्‍हाचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे. उन्‍हाळ्याच्‍या तीव्र झळांपासून बचाव करत आरोग्‍य सांभाळण्याचे आव्‍हान निर्माण झाले आहे. अशात रविवारी दिवसा ढगाळ वातावरणामुळे उन्‍हाच्‍या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात कमालीची वाढ झाली होती. नाशिकच्‍या किमान तापमानाची २२.५ अंश सेल्सिअस नोंद झाली.

यंदाच्‍या उन्‍हाळ्यात (summer) राज्‍यभरात पारा वाढत असताना, अनेक ठिकाणी ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. नाशिकमध्येही दोन-तीन दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक झाले होते. मात्र, बहुतांश वेळा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्‍यान कमाल तापमानाची नोंद सध्या होत आहे. असे असले, तरी उन्‍हाचा तडाखा गेल्‍या महिन्‍याभरापासून नाशिककरांना सहन करावा लागत आहे.

तळपत्‍या सूर्यकिरणांमुळे दैनंदिन जनजीवन प्रभावित होत असून, दुपारी बाजारपेठा, प्रमुख रस्‍ते ओस पडत असल्‍याची स्‍थिती आहे. त्‍यामुळे सकाळी किंवा सायंकाळी शहर व परिसरात वर्दळ बघायला मिळत आहे. उन्‍हाचा तडाखा वाढत असताना, रविवारी मात्र शहरी भागात दिवसभर ढगाळ वातावरणाची अनुभूती नागरिकांनी घेतली. ढगांमुळे उकाड्यात वाढ जाणवत होती. त्‍यामुळे फॅन, एसी, कूलरसह अन्‍य विविध माध्यमांतून गारवा मिळविण्यावर नाशिककरांचा (nashik) भर राहिला.

हेही वाचा: सोनपेठ तालुक्यात उष्माघाताने एकाचा बळी

सायंकाळी उशिरापर्यंत आकाश ढगांनी वेढले असल्‍याने रात्रीपर्यंत उकाडा कायम जाणवत होता. मात्र, ढगाळ वातावरणाने सूर्य झाकोळला गेल्‍याने, तप्त सूर्यकिरणांपासून मात्र नाशिककरांचा बचाव झाल्‍याची दिलासादायक बाब आहे.

हेही वाचा: विदर्भात चटका वाढणार चंद्रपुरातील पारा ४५ अंशांवर

Web Title: Extreme Growth In Heat Due To Cloudy Weather In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiksummerWeather
go to top