नाशिक: शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येते. मात्र, या योजनेच्या पोर्टलवर महाविद्यालयांनी तब्बल एक हजार ४१६ बोगस विद्यार्थ्यांची नोंद करून शासनाची सुमारे सहा कोटी ५३ लाख १६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला.