Latest Crime News | ...चोर आले पळापळा अन् भलताच बनला बळीचा बकरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

Nashik Crime News : ...चोर आले पळापळा अन् भलताच बनला बळीचा बकरा!

नांदुरशिंगोटे (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात नांदूर शिंगोटे परिसरात दिवाळीच्या आधीपासून चोरट्यांनी स्थानिकांची दमछाक चालवली आहे. चोर आले पळापळा ही बात नित्याची बनली असून गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चास रस्ता परिसरात पुन्हा एकदा चोरटे आल्याच्या आवईने भागम भाग बघायला मिळाली.

या धावपळीत मित्राला प्रेयसीच्या भेटीसाठी सोडवून नांदूर शिंगोटे गावाकडे परतणाऱ्या एका तरुणाला मात्र बळीचा बकरा बनवण्याची वेळ आली. अनोळखी असणाऱ्या या तरुणाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र, मित्राचे बींग फुटू नये म्हणून या बिचाऱ्याला पोलिसांचा पाहुणचार सहन करावा लागला. (fake thief call make trouble for loverboy in nandurshingote Nashik News)

बुधवारी रात्री नांदूर शिंगोटे गावालगत असणाऱ्या शिवाजी आव्हाड यांच्या बंगल्यावर रात्री एक वाजेदरम्यान दरोड्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पुन्हा भागात राहत असलेल्या शेळके यांच्या बंगल्याला रात्री नऊ वाजताच चोरट्यांनी लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळ जास्त झालेली नसल्यामुळे व आधीपासून सावध असलेल्या नागरिकांनी धावा धाव केल्यामुळे चोरटे डोंगराच्या दिशेला पसार होण्यात यशस्वी झाले.

धावपळीच्या या कार्यक्रमात सिन्नर तालुक्यातीलच एका गावातील तरुणाला मात्र पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकावे लागले. स्थानिक तरुणांच्या धावपळीत हा अनोळखी तरुण संशयित म्हणून पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आला. पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. मात्र त्याचे या भागात येण्याचे प्रयोजन वेगळेच असल्याने व ते कारणही मित्राच्या सुरक्षेसाठी सांगणे अशक्य असल्याने नाईलाजाने गुन्हा अंगावर घेण्याची वेळ या तरुणावर आली. गुरुवारी रात्री आपल्या एका मित्रासमवेत हा तरुण नांदूर शिंगोटे परिसरातील एका गावात आला होता.

हेही वाचा: Nashik : बाजार समितीत हवाय उच्च दर्जाचा ‘तिसरा डोळा’!

तिथे पाहुण्यांकडे आलेल्या प्रेयसीची तिचा प्रियकर असलेल्या आपल्या मित्राची भेट घालून देण्याचा त्याचा उद्देश होता. मित्राला इच्छित स्थळी सोडल्यानंतर तो त्यांची भेट होईपर्यंत थांबायचे कुठे म्हणून नांदूर शिंगोटे पर्यंत आला आणि बळीचा बकरा बनत पोलिसांच्या कचाट्यात सापडला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तो त्यांना खरे कारण सांगू शकत होता. मात्र मित्राची सुरक्षा व भीतीपोटी त्याने ते सांगणे टाळले. नंतर हा प्रकार लक्षात आला तेव्हा मात्र उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी या प्रकाराबद्दल समजल्यावर नांदूर शिंगोटे परिसरात हा हसण्याचा विषय बनला होता.

असे असले तरी मूळ मुद्दा लोकांच्या सुरक्षिततेबाबत काळजी वाढवणार आहे नांदूर शिंगोटे व परिसरात रात्रीच्या वेळी पण दिवसाढवळ्या देखील चोरट्यांनी दहशत वाजवली आहे पोलीस यंत्रणेला चोरत्यांनी एक प्रकारे आव्हान दिले आहे. नांदूर शिंगोटे दुरुक्षेत्राच्या परिसर वावी पोलीस ठाण्याला जोडलेला आहे. पोलिसांच्या दिमतीला एकच सरकारी वाहन असून तुलनेत कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांना सुरुवात झाल्यापासून चक्क खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेऊन पोलीस व पोलीस मित्र परिसरात पेट्रोलिंग करत आहेत. पोलीस यंत्रणेकडून या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाढीव मनुष्यबळ तसेच वाहनांची व्यवस्था करणे आवश्यक बनले आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ