esakal | काळाचा घाला! महिन्याभरातच कुटुंबाची एकत्रच निघाली अंत्ययात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

family

काळाचा घाला! महिन्याभरातच कुटुंबाची एकत्रच निघाली अंत्ययात्रा

sakal_logo
By
रामदास कदम

दिंडोरी (जि.नाशिक) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (corona second wave) कुटुंबातील प्रिय व्यक्ती गमवावे लागले आहेत. काही अख्खी कुटुंबे (family death) उद्ध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खडक सुकेणा येथील गणोरे कुटुंबीयांना असाच धक्का सहन करावा लागला आहे. (family-death-in-corona-second-wave)

कुटुंबांवर दु:खाचा डोंगर; तीन भाऊ, एक बहिणीचा समावेश

दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणा येथील गणोरे कुटुंबातील तीन भाऊ व एक बहिणीचा मृत्यू महिन्याभराच्या अंतरात झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. खडक सुकेणा येथील वाळू काळू गणोरे यांचा मृत्यू ११ एप्रिलला झाला. भाऊसाहेब काळू गणोरे यांचा १ मेस, त्यांची बहीण चंद्रभागाबाई रायबा निमसे यांचा ६ मेस आणि बाळासाहेब काळू गणोरे यांचा २५ मेस मृत्यू झाला. गणोरे कुटुंबातील जवळजवळ १४ सदस्य कोरोनाबाधित होते. त्यात १० जणांनी कोरोनावर मात केली आहे. या घटनेने संपूर्ण खडक सुकेणा गावांत शोककळा पसरली आहे. बाळासाहेब गणोरे काही दिवसांपूर्वी कादवा सहकारी साखर कारखान्यामधून शेतकी विभागातून सेवानिवृत्त झाले होते. ते एक आदर्श कामगार म्हणून तालुक्यात परिचित होते. दिंडोरी तालुक्यात एकाच कुंटुबांतील चौघांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाळासाहेब गणोरे तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे युवा कार्यकर्ते गणेश गणोरे यांचे वडील होत.

हेही वाचा: कपडे काढो आंदोलन : जितेंद्र भावेंसह समर्थकांवर गुन्हे दाखल

हेही वाचा: जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी