esakal | आणखी किती अंत! आधी विष प्राशन..नंतर मित्राला व्हिडिओ कॉल करून म्हणतो...
sakal

बोलून बातमी शोधा

chinchkheda vinod patil.jpg

विनोद बुधवारी सकाळी नाचणखेडा येथे जात असल्याचे सांगून ते घरून निघाले. मात्र, तेथे न जाता स्वतःच्या दुचाकीवरून वाकोदकडे गेले. या वेळी आधीच विकत घेऊन ठेवलेला विषारी पदार्थ त्यांनी प्रवासादरम्यान सेवन केला. विशेष म्हणजे, विष प्राशनानंतर त्यांनी लगेच भ्रमणध्वनीवरून मित्राला व्हिडिओ कॉल केला..आणि..

आणखी किती अंत! आधी विष प्राशन..नंतर मित्राला व्हिडिओ कॉल करून म्हणतो...

sakal_logo
By
सुरेश महाजन

नाशिक / जामनेर : विनोद बुधवारी सकाळी नाचणखेडा येथे जात असल्याचे सांगून ते घरून निघाले. मात्र, तेथे न जाता स्वतःच्या दुचाकीवरून वाकोदकडे गेले. या वेळी आधीच विकत घेऊन ठेवलेला विषारी पदार्थ त्यांनी प्रवासादरम्यान सेवन केला. विशेष म्हणजे, विष प्राशनानंतर त्यांनी लगेच भ्रमणध्वनीवरून मित्राला व्हिडिओ कॉल केला..आणि..

मित्राला व्हिडिओ कॉल करत सांगितले

विनोद जयराम पाटील, असे या शेतकऱ्याचे नाव असून विनोद यांची पत्नी रक्षाबंधनासाठी केकतनिंभोरा (ता. जामनेर) येथे माहेरी गेलेली होती. एकुलता असलेल्या विनोद यांची तीन एकर शेती असून, त्यांच्यावर देना बँक व अन्य वित्तीय संस्थांचे मिळून जवळपास तीन लाखांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी (ता. ५) सकाळी नाचणखेडा येथे जात असल्याचे सांगून ते घरून निघाले. मात्र, तेथे न जाता स्वतःच्या दुचाकीवरून पहूरहून वाकोदकडे गेले. या वेळी आधीच विकत घेऊन ठेवलेला विषारी पदार्थ त्यांनी प्रवासादरम्यान सेवन केला. विशेष म्हणजे, विष प्राशनानंतर त्यांनी लगेच भ्रमणध्वनीवरून मित्राला व्हिडिओ कॉलिंगद्वारा माहितीही दिल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

परिसरात हळहळ व्यक्त

चिंचखेडा तपोवन (ता. जामनेर) येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली. संबंधित मित्राने त्याच्या नातेवाइकांना घटनेची माहिती कळवताच नातेवाईक घटनास्थळी (वाकोद शिवार) पोचले व विनोद पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.वडील नेहमीच आजारी असतात. त्यात नापिकीमुळे कर्जाचा वाढता डोंगर आदींमुळे त्यांनी नैराश्‍यातून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैद्यकीय अधीकारी डॉ. आर. के. पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

रिपोर्ट - सुरेश महाजन

संपादन - ज्योती देवरे