esakal | शेतकरी बापाच्या स्वप्नासाठी कुस्तीत रमली 'धाकड गर्ल'! अपार कष्ट घेणाऱ्या बापलेकीची आगळी वेगळी कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

farmer and daughter

शेतकरी बापाच्या स्वप्नासाठी कुस्तीत रमली 'धाकड गर्ल'!

sakal_logo
By
योगेश बच्छाव

सोयगाव (जि.नाशिक) : 'ती'चं कर्तृत्व अन प्रचंड मेहनतीचं गारुड आणि 'त्या'चं अधुरे स्वप्न सत्यात उतरवण्याची जिगर किती कमाल करू शकतो याचं प्रत्यंतर दुंधे येथे येत आहे. दंगल चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी बाप लेकीची केमिस्ट्री सध्या या पंचक्रोशीत चर्चिली जात आहे. मुलीला निष्णात कुस्तीपटू बनवण्याचा ध्यास आणि त्यासाठी गावात उपलब्ध साधनांचा चपखल वापर औत्सुक्याचा विषय बनला आहे. निष्णात कुस्तीगीर साकारण्यासाठी अपार कष्ट घेणाऱ्या बापलेकींची ही आगळी वेगळी कहाणी तेवढीच रंजक आहे. (farmer-father-Wrestling-lessons-to-daughter-marathi-news-jpd93)

बापलेकींची ही आगळी वेगळी कहाणी तेवढीच रंजक

दुंधे येथील शेतकरी चिंतामण रौंदळ हे मुलगी रुपाली हिला कुस्तीपटू बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. श्री.रौंदळ यांनी मुलगा मुलगी असा भेद न करता मुली मुलांपेक्षा कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. रुपालीला लहानपणापासूनच वडिलांनी व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. आठवीपासूनच तिच्या मनात व्यायाम व कुस्तीविषयी आवड निर्माण झाली. वडिलांनी तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन करत जिल्हा व राज्य पातळीपर्यंत नेले. मात्र खेळाचे पूर्ण नियम माहीत नसल्यामुळे तिला कुठेतरी डावलले गेले. तरी देखील चिंतामण रौंदळ यांनी मुलीला प्रोत्साहन देत तिच्याकडून रोज कुस्तीचा सराव करून घेत आहेत. रुपाली आता दहावीत शिकत असून ती रोज व्यायामाला महत्त्व देत गावाजवळच्या दुंधे डोंगरावर रोज तीन वेळा चढून उतरते. तिचे वडील चिंतामण रौंदळ यांनी घराजवळच कुस्तीचा सराव करण्यासाठी माती टाकून आखाडा तयार केला आहे. ते तिला मार्गदर्शन करीत रोज कुस्तीचा सराव करून घेतात. रूपालीने आतापर्यंत अनेक यात्रांच्या ठिकाणी देखील कुस्तीची रंगत दाखवली आहे. येणाऱ्या काळात रुपाली कुस्तीचा आखाडा नक्कीच गाजवेल व आपल्या तालुक्यासह जिल्ह्याचे नाव रोशन करेल यात शंका नाही.

रंगीत तालीम व व्यायामाबाबत सर्व मार्गदर्शन वडिलांनी केले. मुलीसाठी वडील हे फक्त पिता नसतात, तर मित्र, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ असे सारे काही असतात. त्यांचे एक स्मित हास्य मुलीला एक उमेद, उभारी देते. येणाऱ्या काळात मेहनत घेऊन नक्कीच वडिलांचे नाव उज्ज्वल करेल. - रुपाली रौंदळ, कुस्तीपटू

माझ्या मोठ्या मुलीने योगा विषयात उडीसा येथे पदवी मिळवली व लहान मुलगी रुपाली हिला आठवीपासून कुस्तीची आवड असल्यामुळे कुस्तीपटू बनवण्याचे स्वप्न आहे. पहिलवान शरद गलांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन रुपालीला मिळाले. - चिंतामण रौंदळ, रुपालीचे वडी

हेही वाचा: कुल्फी विकणारा बनला पैठणी उद्योजक! जामदारीची पैठणी चेन्नईला

हेही वाचा: महिंद्राने परत मागविली नाशिकमध्ये तयार झालेली ६०० वाहने

loading image