NDCC Farmer Protest: कुठे आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी? महिन्याभरानंतरही आंदोलनाची दखल नाही

Protest
Protestesakal

NDCC Farmer Protest : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यांसह प्रमुख मागण्यांसाठी १ जूनपासून धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहे.

महिना उलटूनही राज्य शासनाने दखल न घेतल्याने २० जुलैपासून शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, सुधाकर मोगल आदींनी केली.

‘सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी, पण इथे कुठे आहे आमच्या पाठीशी,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. (Farmer Protest against NDCC Bank after month no notice of movement from government nashik)

पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर १६ जानेवारीला बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता, त्या वेळी मागण्यांचे निवेदन दिले होते. परंतु सहा महिने उलटूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही.

बॅंकेचे संचालक मंडळ, तसेच श्रीमंत शेतकरी यांची वसुली आधी करा, मगच शेतकऱ्यांची करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांकडून संघर्ष सुरू केला आहे.

जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाच्या नोटिसा गोदावरी नदीपात्रात बुडवून सुरू केलेले आंदोलन, धरणे उपोषण यापूर्वी केले आहे. १ जूनपासून उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी पाठिंबा देत असले तरी शासनाने दखल घेतलेली नव्हती.

त्यानंतर १४ जूनला विभागीय सहनिबंधक कार्यालय तथा जिल्हा बॅंकेसमोर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र, या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. या वेळी बॅंक प्रशासनाशी चर्चा झाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Protest
Nashik Women Helpline : महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांची हेल्पलाइन कार्यान्वित

यात त्यांनी तोंडी आश्वासन दिले होते. परंतु त्यावरही कार्यवाही झालेली नाही. कैलास बोरसे, दिलीप पाटील, दत्तात्रय सुडके, देवा वाघे, अनंत पाटील, नंदकुमार देवरे, दीपक निकम, बापूसाहेब जाधव, विश्राम कामाले, धोंडिराम थैल, सुनील देवरे, भाऊसाहेब पाटील, रामराव मोरे, दगाजी आहिरे आदी उपस्थित होते.

स्थगिती नाहीच, वसुली सुरू

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत २१ जूनला पुणे येथे भेट झाली होती. तेव्हा ठाकरे यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून वसुली स्थगित करणार असल्याचे सांगितले होते.

प्रत्यक्षात बॅंकेकडून वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांचे एक महिना पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २० जुलैपासून अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ केला जाणार असल्याचे बोराडे यांनी सांगितले.

Protest
Nashik News: वेगावर नियंत्रण अन् वाहनचालकांची जनजागृती! जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटची पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com