पाइपलाइन दुरुस्त करणे बेतले जीवावर; धरणात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Died Farmer Subhash Pagar

पाइपलाइन दुरुस्त करणे बेतले जीवावर; धरणात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

सोग्रस (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील खडकओझर येथील केद्राई धरणात (Dam) सुभाष मुरलीधर पगार (वय ४५, रा. खडक ओझर) यांचा बुडून मृत्यू झाला. (Farmer Repairs to pipeline dies after drowning in dam Nashik Accident News)

शनिवारी (ता. ३०) सकाळी अकराला केद्राई धरणातून पाईपलाईनद्वारे पिकांना पाणी देत असताना पाईपलाईन (Pipeline) बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाईपलाईन का बंद झाली, हे पाहण्यासाठी ते केद्राई धरणाजवळ आले. धरणाजवळील काठावर त्यांनी कपडे, मोबाईल, चप्पल काढून पाण्यात उतरू दुरुस्ती करीत असताना ते पाण्यात बुडाले. सायंकाळी सातपर्यंत ते घरी न परतल्याने भाचा सार्थक त्यांना शोधण्यासाठी धरण परिसरात आला. काठावर कपडे, मोबाईल व चप्पल आढळून आली. याबाबत ग्रामस्थांना माहिती कळविली. (Farmer Repairs to pipeline dies after drowning in dam Nashik Accident News)

हेही वाचा: नाशिक : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता

शिवसेनेचे (Shiv Sena) चांदवड तालुका समन्वयक सोमनाथ पगार, विनता पतसंस्थेचे वसंत पगार, ज्ञानेश्‍वर पगार, गणेश पगार, सोसायटी अध्यक्ष बाजीराव पगार आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात शोध सुरू केला. त्यावेळी सुभाष पगार यांचा मृतदेह आढळून आला. वडाळीभोई शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुभाष पगार यांना तपासून मृत घोषित केले. यासंदर्भात वडाळीभोईचे पोलिस अधिकारी कैलास इंद्रेकर, मच्छिंद्र कराड तपास करीत आहे.

हेही वाचा: सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINK जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक

Web Title: Farmer Repairs To Pipeline Dies After Drowning In Dam Nashik Accident News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top