Leopard
Leopardesakal

Nashik News : बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकऱ्याने मोठ्या शिताफीने केला स्वतःचा बचाव

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : वेळ संध्याकाळी सात वाजेची सुर्य मावळल्या नंतर अल्पशा वेळेत सायंकाळ प्रकाशाला रात्रीच्या गर्भात झोकून देण्यआधीच्या अंधूक उजेडात दिवसभराचे शेतातील काम उरकून घरी निघायच्या वेळी अचानक समोर आलेल्या बिबट्याच्या तावडीतून मोबाईल बॅटरीच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करुन घेत साक्षात मृत्यूच्या दाढेतून शेतकऱ्याने स्वतःचा जीव वाचवला आहे.

सदर घटनेची इगतपुरी तालुकाभरात चर्चा सुरु असून रब्बी पिकांसाठी पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये दहशत असून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे. (farmer saved himself from attack of leopard at aswali station Nashik News)

कुऱ्हेगाव ता.इगतपुरी येथील ज्ञानेश्वर शिंदे हे शेतकरी पट्टीच्या मळ्यात दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी अंधार पडायच्या वेळी घराकडे निघणार इतक्यात शेताच्या बांधावरील तनसाच्या गंजीआड दोन डोळे चमकले.

क्षणभर वाटले मांजर असेल मात्र आकारावरून मांजर नसून बिबट्याच असल्याची खात्री पटली होती. बिबट्याचे पूर्ण लक्ष माझ्याकडेच असल्याचे जाणवताच मग काय पावले आपोआपच घराकडे निघाली अन अचानक बिबट्या समोर उभा पाहून काही काळ हृदयाची धडधड वाढली.

जणू मृत्यूच पुढे उभा होता तरीही न डगमगता सावध होवून प्रतिकार करायचे ठरवले मात्र जवळपास काहीही उपलब्ध नव्हते. खिशात फक्त तेवढा मोबाईल होता हळूच मोबाईलची बॅटरी सुरु केली. बिबट्या अगदी पाच ते सहा फुटांवर होता.

त्याने मारलेल्या पायाचा पंजा थोडक्यात स्पर्श करुन गेला इतक्यात बॅटरीच्या उजेडाने त्याचे डोळे दिपल्याने मी मागे सरकलो अन आरडाओरडा केला. शेजारील शेतकरीही धावले बिबट्याने तितक्यात धूम ठोकली.

तेव्हा कुठे जीव भांड्यात पडल्याची आप बीती ज्ञानेश्वर शिंदे सांगत होते. घटनेची माहिती गावभर पसरल्याने प्रत्येक जण घटनेविषयी कुतूहलाने विचारत होता. यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले होते.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Leopard
Nanded Crime : बाप अन् सख्खा भाऊच ठरले 'ती'चा 'काळ'; नात्यातील मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याने केली हत्या

आज चक्क हल्ला केल्याने कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच निर्मला नामदेव धोंगडे,सदस्या सुशीला धोंगडे,स्वाती गव्हाणे, संतोष धोंगडे ,जयराम गव्हाणे,ग्रामसेविका केदारे मॅडम, भगवान धोंगडे,अनिल धोंगडे,गणेश धोंगडे,गोरख शिंदे,जगन शिंदे,केशव शिंदे,जगन धोंगडे,अशोक धोंगडे आदी ग्रामस्थांनी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

"शेतातील काम आटोपून संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी सात वाजता घराकडे निघणार इतक्यात तनसाच्या उडव्यामागे दोन डोळे चमकले हालचाली वरुन बिबट्या असल्याची खात्री पटली. दुसऱ्या क्षणी बिबट्या रस्त्यावर मला आडवा झाला. प्रतिकार करण्यासाठी काहीच नसल्याचे काहीच सुचेना हळूच मोबाईलची बॅटरी लावली बिबट्या अगदी पाच-सहा फुटांवर होता. त्याने मारलेल्या पंजा माझ्या कपड्यांना स्पर्श करुन गेला. बॅटरीचा उजेडात त्याचे डोळे दिपल्याने मी मागे सरकलो अन आरडाओरडा केला. बाजूचे शेतकरीही धावले अखेर बिबट्याने धूम ढोकली. सावध राहून मोबाईलच्या बॅटरी मुळे आज मृत्यूच्या दाढेतून वाचलो आहे."

- ज्ञानेश्वर शिंदे,शेतकरी कुऱ्हेगाव.

Leopard
Nandurbar Crime News : नवापूर वन विभागाने पकडला अवैध लाकूडसाठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com