Onion News : येवल्यात लाल कांद्याला 1600 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांमध्ये नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion low prices news

Onion News : येवल्यात लाल कांद्याला 1600 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

येवला : बाजार समितीच्या मुख्य व अंदरसुल येथील उपबाजार आवारावर उन्हाळ कांदा आवकेत घट झाली. तर बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. गत सप्ताहात लाल कांद्याची आवक सुरु झालेली असून लाल कांद्याचे बाजारभाव १ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल पर्यंत होते. उन्हाळसह लाल कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

हेही वाचा: Onion Rate : कांद्याच्या भावात होताय सातत्याने चढउतार

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक इत्यादी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक २१ हजार १९७ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान १५० रूपये ते कमाल १ हजार ३६१ रुपये तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते.

अंदरसुल उपबाजार आवारावर उन्हाळ कांद्याची एकूण आवक ७ हजार ४२४ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २०० रुपये, कमाल १ हजार १८० रुपये तर सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

हेही वाचा: Agriculture News : कापसाचे दर मकरसंक्रांतीनंतर वाढीची शक्यता; जिनिंग चालक संपावर जाणार?

गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हाची एकुण आवक २० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान २३५० रुपये, कमाल २९५१ रुपये तर सरासरी २७०० रुपये पर्यंत होते. सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीची एकूण आवक १३ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १ हजार ९५० रुपये , कमाल २ हजार ३५० रुपये तर सरासरी २ हजारापर्यंत होते.

हरभऱ्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरभऱ्याची एकूण आवक १६४ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ४ हजार रुपये, कमाल ५ हजार ६५० रुपये तर सरासरी ५ हजार २०० रुपये पर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.

सोयाबीनची एकूण आवक ४०८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ४ हजार ८५१ रुपये, कमाल ५हजार ५५० रुपये तर सरासरी ५ हजार ४८० रुपये पर्यंत होते. मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सप्ताहात मक्याची एकुण आवक २७ हजार १८० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १ हजार ८५० रुपये , कमाल २ हजार १५१ रुपये तर सरासरी २ हजार ६० प्रति क्विंटल पर्यंत होते.

हेही वाचा: Jalgaon Agriculture News : बळीराजाला दिलासा! जिल्‍ह्यात खतांचा पुरेसा साठा; या अधिकाऱ्यांशी साधा संपर्क

अंदरसुल उपबाजार आवारावर मका, सोयाबीन व भुसाराान्य लिलाव सुरु असून अंदरसुल परिसरातील शेतकरी बांधवांनी आपली मका, सोयाबीन व भुसार रास्त भावाने विक्रीस आणावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी केले आहे