Nashik: शेतकऱ्यांना कापणी मजुरी परवडेना अन पशुपालकांनाही गरज असल्याने तडजोड करीत साठवणूक

While transporting fodder from a tractor trolley for transporting fodder
While transporting fodder from a tractor trolley for transporting fodderesakal

खामखेडा : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. त्यामुळे पुढील आठ-नऊ महिने लक्षात घेता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात आहे.

त्यामुळे पशुपालक आतापासून चाऱ्याची व्यवस्था करीत आहेत. अनेक दुग्ध व्यावसायिक तसेच दुष्काळी भागातील शेतकरी मिळेल तो चारा उपलब्ध करून घेत व वाहतूक करतानाचे चित्र सध्या खामखेडा व परिसरात पाहावयास मिळत आहे. ‘मका कापून द्या व चारा घेऊन जा’ या बोलीवर अनेक शेतकरी चारा देऊ लागले आहेत. (Farmers unable to afford harvesting wages cattle rearers need storage by compromising rain crisis at khamkheda Nashik)

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुढील आठ-नऊ महिने जनावरांचा चारा कसा पुरवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना पुढील वर्षी पावसाळ्यापर्यंत पुरेल इतक्या चाऱ्याची व्यवस्था शेतकरी सध्या करीत आहेत.

सध्या काढणीला आलेला मक्याचा कडबा, बाजरी, ज्वारी यांचा कडबा साठवणूक करून ठेवतात. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने कडबाही पुरेसा नाही.

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी हंगामातील गहू व रब्बीतील हिरवा चारा उपलब्ध होणार नसल्याने सध्या ज्या भागात मक्याचा कडबा चांगला आहे, अशा भागातून मक्याच्या कडबा विकत घेऊन मालेगाव, नांदगाव, देवळा, चांदवड तालुक्यांच्या पूर्व भागातील शेतकरी, दुग्ध व्यावसायिक खरेदी करू लागले आहेत.

कळवण तालुक्यांच्या पश्चिम पट्ट्यात तसेच देवळ्याच्या पश्चिम भागातील भऊर, खामखेडा, पिळकोस, भादवण, विसापूर या भागातील शेतकरी मका कापणीसाठी मजूर मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करतात, म्हणून मका कापून द्या व चारा घेऊन जा अशा बोलीवर चारा देत आहेत.

मालेगाव तसेच नांदगाव तालुक्यातील अनेक शेतकरी पशुपालक चारा घेण्यासाठी वाहनाबरोबर कापणीसाठी मजूर घेऊन येत असून, या भागातील शेतकऱ्यांचा मका कापून चारा स्वतः घेऊन जात आहेत. अनेक शेतकरी ट्रॉलीच्या हिशेबाने तीन ते चार हजार दराने ट्रॉलीभर चारा देत आहेत.

ज्या भागात चांगला पाऊस आहे, त्या भागातील मक्याचे पीक चांगले होते. कळवण तालुक्याचा पूर्व भाग व देवळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये चांगल्या पावसामुळे मक्याचा चारा चांगला आहे.

अनेक शेतकरी आपल्याला लागेल तेवढा चारा ठेवून बाकीचा शिल्लक राहणारा चारा विक्री करू लागले आहेत. हा चारा पुढील काळात उपयोगात येईल म्हणून आता शेतकरी या चाऱ्याची साठवणूक करताना दिसत आहेत.

While transporting fodder from a tractor trolley for transporting fodder
Nashik: कृषी विभागाच्या योजनांना शिवरायांचे नाव! मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानातील अडचणीही केल्या दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com