esakal | धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

sinner.png

सिन्नर पोलिसांनी म्हणणे जाणून न घेता घाईघाईत पंचनामा व फिर्याद दाखल करून घेतल्याची तक्रार विवाहितेचे वडील पंढरीनाथ केरू भोर (रा. जानोरी, ता.इगतपुरी) यांनी सोमवारी (ता.31) नाशिकच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे केली आहे.

धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

sakal_logo
By
ज्ञानेश्वर गुळवे

नाशिक : मुसळगाव (ता. सिन्नर) येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (वय २५) हिचा सासरच्या मंडळींनी छळ करून तिला मारून विहिरीत फेकल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सिन्नर पोलिसांनी म्हणणे जाणून न घेता घाईघाईत पंचनामा व फिर्याद दाखल करून घेतल्याची तक्रार विवाहितेचे वडील पंढरीनाथ केरू भोर (रा. जानोरी, ता.इगतपुरी) यांनी सोमवारी (ता.31) नाशिकच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे केली आहे.

अशी आहे घटना
 
जानोरी येथील पंढरीनाथ भोर यांची मुलगी माधुरी हिचा विवाह १२ मार्च २०१८ ला विकास नामदेव शिरसाट याच्यासोबत झाला. तेव्हापासून सासरचे पाइपलाइन व ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत होते. अडचण असूनही ४० हजार रुपये दिले. सासरचे लोक मला मारून टाकतील, अशी तिला भीती वाटत होती. तरीही काही दिवसांत तिच्या सासरच्या मंडळींना ट्रॅक्टरसाठी दोन लाख रुपये देण्याची तयारी केली होती. मात्र, याच दरम्यान शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी, 'माधुरी जानोरीला आली का? ती गायब आहे', असा तिच्या सासरच्यांचा फोन आला. 

पित्याला घातपाताचा संशय

पंढरीनाथ भोर व त्यांची पत्नी तेथे गेल्यावर काही वेळातच एक पोलिस, रुग्णवाहिका पाण्यात उतरण्यासाठी दोर व इतर साहित्य घेऊन एक पथक आले. त्या पार्श्वभूमीवर मुलीचा घातपात झाला आहे म्हणून मी सिन्नर पोलिसांना तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच सात दिवसांपूर्वी तिला सोन्याचे दागिने दिले होते. परंतु माधुरीचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा तिच्या अंगावर बनावट दागिने होते. मात्र, माझे कुणी काही ऐकून घेतले नाही. त्यामुळे माधुरीच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी तिच्या वडिलांची मागणी आहे. 

हेही वाचा > गंभीर! १५ वर्षीय मुलीची बापा विरोधात तक्रार; वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकार उजेडात

तक्रारीची चौकशी केली जाईल. कायदा कुणालाही सोडत नाही. तिथल्या परिस्थितीबाबत माहिती घेऊन नियमानुसार पुढची कारवाई केली जाईल. 
- डॉ. आरती सिंह, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक 

हेही वाचा > एकीकडे गौराईनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर; दुसरीकडे 'ती'च नकोशी? चिमुरड्या जीवाला शिक्षा कशासाठी?

संपादन - किशोरी वाघ

loading image