उन्हामुळे नाशिककरांच्या ताणतणावात वाढ; डॉक्टरांचा निष्कर्ष

rising heat causes mental health
rising heat causes mental healthesakal

नाशिक : थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिककरांना आता उष्णतेपासून सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे वाढत्या उष्णतेमुळे शरीरावर जेवढे गंभीर परिणाम होत आहे. त्यापेक्षा भयानक परिणाम मानसिक संतुलन बिघडण्यावर (Mental Health Imbalance) होत असल्याची बाब वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या पाहणीतून समोर आली आहे. ही बाब नवीन नसली तरी थंड हवेची सवय असलेल्या नाशिककरांना सावधानतेचा इशारा देणारी आहे. (Fear of mental imbalance due to rising temperature Doctor conclusion Nashik Summer News)

गेल्या काही वर्षात नाशिकमधील तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. साधारण २००५ च्या दरम्यान उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोचले तरी घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती. परंतु, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वर्षी ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोचल्याने विदर्भ, खानदेशप्रमाणे नाशिकची स्थिती झाली आहे. दरवर्षी मे महिना सर्वाधिक उष्णतेचा असतो. या वर्षी एप्रिल महिन्यातच मे महिन्याचे रेकॉर्ड ब्रेक झाले. उष्णतेमुळे शरीरावर परिणाम होतो. जसे त्वचा काळी पडणे, भोवळ येऊन मृत्यू होणे, सन स्ट्रोकमुळे (Sun Stroke) जागीच मृत्यू होणे, असे प्रकार घडतात.

rising heat causes mental health
नाशिक : सेंट्रल किचन कारवाई कधी?

परंतु, आता शरीरासह मानसिक परिणामदेखील गंभीर स्वरूप धारण करत असल्याची बाब वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या पाहणीतून समोर आली आहे. वाढत्या उन्हामुळे सामाजिक तणाव वाढतात. बाजारपेठेच्या ठिकाणी आधीच ध्वनी व वायु प्रदूषण असते. त्यात उष्णतेची भर पडल्यानंतर क्षुल्लक गोष्टींवरूनही तणाव निर्माण होतो. झोपडपट्ट्यांच्या भागात दर ठराविक टप्प्यावर संघर्ष सुरू असतो. पत्र्यांचे घरे, एक मजली घरे, ज्या भागात असतात त्या भागात वांरवार भांडणे होत असतात. गरमीमुळे रात्री उशिरा झोपण्याचे प्रमाण वाढते. परिणामी मद्यपानाचेही प्रमाण वाढते. उशिरा उठल्याने मद्यपींची झिंग कायम राहते. त्यातून वाद, संघर्षाचे प्रकार घडतात. उन्हाळ्यात बरेच वाद पोलिस ठाण्यात पोचत असले तरी अनेक वाद गल्लीत, घरांमध्येच मिटविले जातात. या मानसिक ताणतणावाला वाढती उष्णता कारणीभूत असल्याच निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

rising heat causes mental health
नाशिक : कमी वयात रेशीम गाठ बांधणाऱ्यांचा रोखला विवाह

बिअर, कोल्ड्रिंक अन्‌ नकारात्मक बातम्या

उन्हामुळे घर व बाहेरील वातावरण तापलेले असते. अशा तप्त वातावरणात मेंदू तेवढाच गरम असतो. त्यामुळे नकारात्मक (Negative) गोष्टींकडे व्यक्ती लवकर आकर्षित होतो. त्याचा परिणाम कौटुंबिक व सामाजिक वातावरण बिघडण्यावर होतो. या काळात नकारात्मक बातम्यांचाही परिणाम अधिक वेगाने होत असल्याने नकारात्मक बाबींचे सकारात्मकतेत रूपांतर करणे शिकणे गरजेचे आहे, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. उन्हामुळे अनेकांना थंड बिअर हे मादक पेय घेण्याची इच्छा होते. परंतु उन्हाळ्यात शरीराला अत्यंत धोकादायक आहे. बिअर सेवनाने शरीरावर दुष्परिणाम होतात. पेयामध्ये आधीच गॅस असतो. तो थंड करून पोटात टाकल्यावर तोच पोटातील गॅस तत्परतेने बाहेर येत असल्याने त्याचे शरीरासह मानसिक परिणाम होत असल्याची बाबदेखील सर्वेक्षणातून समोर आली आहे.

वाढत्या उन्हाचे मानसिक परिणाम

- चिडचिड होणे.

- सहनशक्ती कमी होणे.

- स्ट्रेस हार्मोन (कॉर्टीसॉल) वाढणे.

- हृदय स्पंदन वाढणे. (हार्ट रेट)

- मेंदू गोंधळणे.

- एकाग्रता मिळत नाही.

मानसिक शांततेसाठी

- सकाळी लवकर उठून योगासने, प्राणायाम करणे.

- पाणी भरपूर पिणे.

- फळांचे रस सेवन करणे.

- कोकम, कैरीचे पन्हे, ताकाचा अधिक समावेश असलेले सरबत

पेय घेणे.

- हलके कपडे परिधान करणे (सफेद कपड्यांना प्राधान्य)

- उन्हात कमी फिरणे.

- मसालेदार पदार्थ कमी खाणे.

- मांसाहार टाळणे योग्य.

२५ सेल्सिअस तापमानावर एअर कंडिशनर

अनेकदा एअर कंडिशनर रूममध्ये तासनतास बसणेदेखील शरीराला धोकादायक आहे. एअर कंडिशनर रूममध्ये चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान ठेवावे. थंड रूममधून बाहेर पडण्यापूर्वी वातावरणाशी समरुप होण्यासाठी काही काळ एसी बंद करावा. हेच वर्तन कारचा एसी चालू असतानादेखील करावे. थंड वातावरणातून तप्त वातावरणात लगेच गेल्यास सन स्ट्रोक बसणे किंवा रक्तदाबाचे प्रमाण वेगाने कमी- अधिक होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली.

"उन्हाळ्यात अधिक उष्णतेमुळे मानसिक संतुलन बिघडते. यातून हिंसक घटना घडण्याची शक्यता असल्याने मानसिक संतुलन गरजेचे असते. उन्हात बाहेर न पडणे, थंड पेये सातत्याने सेवन करणे, सकाळी लवकर उठून व्यायाम करणे हे उपाय आहेत."

- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com