
नाशिक : सेंट्रल किचन कारवाई कधी?
नाशिक : महिन्यांपूर्वी १४ हजार किलो तांदूळ (Rice) दडवादडवी प्रकरणी अनामत रक्कम जप्तीच्या आदेशानंतरही वादग्रस्त ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. महिना उलटूनही शिक्षण विभागाने (Department of Education) अद्याप कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या ठेकेदार संस्थेच्या बचावासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात की काय, अशी चर्चा सुरू आहे. (No action taken against Central Kitchen contractor Nashik News)
शालेय पोषण आहाराचा १४ हजार किलो तांदूळ ठेकेदार संस्थेने दडवल्याचे प्रकरण तीन महिन्यांपूर्वी समोर आले. त्यानंतर यात ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश काढले शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महापालिकेचे प्रशासक रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी यात लक्ष घातले. शालेय पोषण आहारासाठी (School nutrition diet) महापालिकेने १३ ठेकेदार संस्थांना काम दिल्यानंतर या संस्थांकडून विद्यार्थ्यांना निकृष्ट आहारपुरवठा करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी आढळलेल्या ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले.
हेही वाचा: नाशिक : कमी वयात रेशीम गाठ बांधणाऱ्यांचा रोखला विवाह
मात्र, तरीही संबंधित ठेकेदारांनी बिलांसाठी प्रयत्न केले. पंचवटीतील स्वामी विवेकानंद महिला बचत संस्थेकडे १४ हजार किलो शासकीय तांदूळ आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाचीदेखील चौकशी करून संबंधित संस्थेची अनामत रक्कम जप्त करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. मात्र, या आदेशाची शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान, याप्रकरणी आयुक्तांनी लक्ष घातले असून, आता पुढे काय कारवाई होणार याकडे महापालिका (NMC) वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Success Story : सायकल दुरुस्ती करणाऱ्याच्या मुलाची 'गरूडझेप'
Web Title: No Action Taken Against Central Kitchen Contractor Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..